कडेगाव : काेराेना काळात आशा सेविका प्रशासनाच्या बराेबरीने काम करीत आहेत. आता पावसाळा सुरू हाेत असल्याने त्यांना छत्र्यांची गरज भासणार आहे. यामुळे आमदार माेहनराव कदम व डॉ. शिवाजीराव कदम यांच्या वाढदिवसानिमित्त विश्वजितेश फाऊंडेशनतर्फे जिल्हाभरातील आशा सेविकांना छत्र्यांचे वाटप करण्यात येणार आहे. या उपक्रमाची सुरुवात कडेगाव येथे सागरेश्वर सुतगिरणीचे अध्यक्ष शांताराम कदम यांच्या हस्ते करण्यात आली.
कोरोना प्रादुर्भावाच्या काळात जीवाची पर्वा न करता गावोगावी वाड्यावस्त्यांवर जाऊन माहिती गोळा करण्याचे काम आशा सेविकांच्या माध्यमातून सुरू आहे. आता पावसाळ्यात
आशा सेविकांना छत्रीची गरज आहे.
यामुळे विश्वजितेश फाऊंडेशनच्या वतीने जिल्ह्यातील सर्व जवळपास दोन हजार आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक महिलांना छत्र्यांचे वाटप करण्यात येत आहे. कडेगाव येथील नगर पंचायत परिसरात कडेगाव तालुक्यातील १२९ आशा व ८ गटप्रवर्तक महिलांना सागरेश्वर सहकारी
सुतगिरणीचे अध्यक्ष शांताराम कदम यांच्या हस्ते छत्र्यांचे वाटप करून या उपक्रमाची सुरूवात करण्यात आली. यावेळी युवा नेते जितेश कदम, कडेगाव नगराध्यक्षा संगीता
राऊत, उपनगराध्यक्ष दिनकर जाधव, नगरसेवक सागर सूर्यवंशी, सोनहिराचे संचालक दीपक भोसले, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रकाश जाधव, सागरेश्वर सुतगिरणीचे उपाध्यक्ष महेश कदम,
युवा नेते दिग्विजय कदम, हर्षवर्धन कदम आदी उपस्थित होते.
फोटो : १५ कडेगाव २
ओळ :
कडेगाव येथे विश्वजितेश फाऊंडेशनच्या वतीने आशा स्वयंसेविकांना छत्री वाटप करताना सागरेश्वर सुतगिरणीचे अध्यक्ष शांताराम कदम, युवा नेते डॉ. जितेश कदम, नगराध्यक्षा संगीता राऊत, उपनगराध्यक्ष दिनकर जाधव व अन्य.