शिवजयंती उत्सवाचा खर्च टाळून विविध कलाकारांना नितीन शिंदे, स्वाती शिंदे यांच्याहस्ते कीट वाटप करण्यात आले. यावेळी प्रसाद रिसवडे, संतोष पाटील, सुरेश गरड आदी उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : वंदेमातरम् शिवाेत्सव मंडळातर्फे सांगलीतील व शिवभक्त कुटुंबीयांना जीवनावश्यक वस्तूंचे कीट वाटप करण्यात आले. दरवर्षी उत्सवामध्ये योगदान देणाऱ्या शाहीर, तुतारी वादक, हलगी वादक, तलवार व दांडपट्टा खेळणारे, मंडप व स्पीकर व्यावसायिक यांची यंदा लॉकडाऊनमुळे हलाखीची स्थिती निर्माण झाली आहे. अशा सुमारे २०० कुटुंबीयांना कीटचे वाटप झाले. उत्सवाच्या खर्चातून कीटची तरतूद करण्यात आली. माजी आमदार नितीन शिंदे व नगरसेविका ॲड. स्वाती शिंदे यांच्याहस्ते वाटप झाले. प्रारंभी शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून पूजन केले.
यावेळी प्रसाद रिसवडे, संतोष पाटील, सुरेश गरड, सुनीता इनामदार आदी उपस्थित होते.