शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
3
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
4
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
5
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
6
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
7
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
8
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
9
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
10
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
11
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
12
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
13
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
14
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
15
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
16
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
17
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
18
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
19
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
20
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
Daily Top 2Weekly Top 5

कुपवाडला दत्तात्रय पाटोळे यांच्या स्मरणार्थ पूरग्रस्तांच्या जनावरांना चारा वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:27 IST

कुपवाड : सांगली शहर राष्ट्रवादीचे माजी जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय महादेव पाटोळे यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त सांगलीतील पूरग्रस्त भागातील नागरिकांसाठी ...

कुपवाड : सांगली शहर राष्ट्रवादीचे माजी जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय महादेव पाटोळे यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त सांगलीतील पूरग्रस्त भागातील नागरिकांसाठी जेवण व त्यांच्या जनावरांसाठी चारा वाटप करण्यात आले.

दत्तात्रय पाटोळे यांच्या पत्नी वनिता पाटोळे व युवक राष्ट्रवादीचे माजी अध्यक्ष सागर माने यांच्यावतीने तसेच नगरसेवक विष्णू माने, शेडजी मोहिते, शहर जिल्हा उपाध्यक्ष विजय खोत, युवकचे अध्यक्ष सुनील भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत पूरग्रस्त भागातील नागरिकांसाठी जेवण व जनावरांसाठी चारा वाटप करण्यात आले. आण्णाप्रेमी ग्रुप व राष्ट्रवादीच्यावतीने वाघमोडेनगर येथील पाटोळे यांच्या निवासस्थानी तसेच कुपवाड येथे उभारलेल्या निवारा केंद्रात दत्ता पाटोळे यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी शहराध्यक्ष संजय तोडकर, अमित वाघमोडे, चेतन पाटोळे, सुरेश शिंदे, प्रशांत बजंत्री, प्रथमेश मस्के, गजानन सरगर यांसह राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

फोटो : ३० कुपवाड १

ओळ : कुपवाड येथे दत्तात्रय पाटोळे यांच्या स्मरणार्थ पूरग्रस्तांच्या जनावरांना चारा वाटप करण्यात आले. यावेळी वनिता पाटोळे, सागर माने, विष्णू माने आदी उपस्थित होते.