शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

जत तालुक्यातील ४२ गावांचे पेढे वाटप

By admin | Updated: July 9, 2015 23:35 IST

आंदोलन स्थगित : राज्य शासनाकडून मागण्या मान्य; सांगलीत जल्लोष

सांगली : येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारपासून सुरू असलेल्या जत तालुक्यातील ४२ गावांच्या शेतकऱ्यांचे आंदोलन गुरुवारी सकाळी स्थगित करण्यात आले. मागण्या मान्य झाल्याने शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जल्लोष केला. पेढे वाटून व गुलालाची उधळून करून आनंद व्यक्त करण्यात आला.जत पूर्व भागातील उमदीसह ४२ गावांचा म्हैसाळ उपसा सिंचन योजनेत समावेश करून शेतीला पाणी द्यावे, अन्यथा सरकारने कर्नाटकात जाण्याचे नाहरकत पत्र द्यावे, या मागणीसाठी हे ठिय्या आंदोलन सोमवारपासून येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू होते. पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष सुनील पोतदार, उपाध्यक्ष अनिल शिंदे, दावल शेख आदींच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू होते. मुंबईमध्ये बुधवारी सायंकाळी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यामध्ये या गावांचा शेतीचा पाणीप्रश्न मिटविण्यासाठी ३२ कोटी रुपये देण्याचे मान्य करण्यात आले. तसे लेखी पत्रही आंदोलनकर्त्यांना देण्यात आले. त्यानंतर सांगलीत सुरू असलेले आंदोलन स्थगित करण्यात आले. यावेळी संजय तेली, मल्लिकार्जुन सुरगोंड, बसाप्पा कोल्याळ, हरीष शेटे, राजू चव्हाण, मल्लाप्पा सालुटगी, सुनील पवार, लघु पाटबंधारे विभागाचे अधिकारी सचिन पवार, एस. आर. घोलप आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)आभारपत्रही सादर...गुरुवारी सकाळी मुंबईत गेलेले कार्यकर्ते सांगलीत आंदोलनस्थळी आले. त्यांनी आंदोलनकर्त्यांना शासनाचे पत्र दाखविले. याचवेळी शासनाचे आभार मानणारे पत्र आंदोलनकर्त्यांकडून जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांना देण्यात आले. यानंतर एकच जल्लोष करण्यात आला.