शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

करोली (टी)मध्ये वीज कार्यालयाची तोडफोड

By admin | Updated: January 13, 2015 00:09 IST

कर्मचाऱ्यांना चोप : झिरो वायरमनच्या मृत्यूनंतर उद्रेक

कवठेमहांकाळ : आॅपरेटरच्या चुकीमुळे करोली (टी) (ता. कवठेमहांकाळ) येथील झिरो वायरमनचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. यामुळे संतप्त गावकऱ्यांनी महावितरणच्या कार्यालयावर तुफान दगडफेक करीत कार्यालयाची मोडतोड केली. तसेच आॅपरेटर, वायरमन, शाखा अभियंता यांना चोप दिला. पोलीस घटनास्थळी पोहोचल्याने अनर्थ टळला. संभाजी बाबूराव एडके (वय ३८, रा. करोली) असे मृताचे नाव असून, ही घटना आज (सोमवारी) दुपारी सव्वाबारा वाजता घडली.करोटी (टी) येथील बंडगरवाडी तलावानजीक डीपी क्र. ११ पंधरा दिवसांपासून नादुरुस्त असल्याचे येथील शेतकऱ्यांनी महावितरण कार्यालयास कळविले. आज (सोमवारी) वायरमन प्रकाश वावरे यांनी हा डीपी दुरुस्त करण्यास एडके यांना सांगितले. एडके यांच्यासोबत विद्युत सहायक दीपाली पाटील, शेतकरी विनायक पाटोळे होते. वावरे यांनी डीपी दुरुस्त करण्यासाठी करोली (टी) येथील महावितरणचे आॅपरेटर मारुती राजाराम चव्हाण यांना वीजपुरवठा बंद करण्याचे पत्र १२ वाजता दिले. त्यानंतर डीपी दुरुस्त करण्याचे काम एडके यांनी सुरू केले. परंतु डीपी दुरुस्त करण्याचे काम सुरू होऊन अवघी पाचच मिनिटे झाली असताना, आॅपरेटर चव्हाण यांनी वीज पुरवठा सुरू केला. वीज पुरवठा सुरू झाल्याने एडके यांना जोराचा धक्का बसून ते २४ फूट उंच असलेल्या विजेच्या खांबावरून खाली कोसळले व त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही बातमी समजताच शेकडो गावकऱ्यांनी करोली (टी) येथील वीज महावितरणच्या कार्यालयावर तुफान दगडफेक केली, कार्यालयाच्या काचा फोडल्या, खुर्च्या तोडल्या. मारुती चव्हाण यास बेदम चोप दिला. एडके यांचा मृत्यू होऊनही उध्दट उत्तरे देणाऱ्या शाखा अभियंता शशिकांत दिघे व वायरमन प्रकाश वावरे यांनाही ग्रामस्थांनी चोप दिला.कवठेमहांकाळचे पोलीस निरीक्षक युवराज मोहिते पोलिसांसह घटनास्थळी वेळीच आले व त्यांनी जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला.एडके झिरो वायरमनचे काम करीत होते. काही दिवस त्यांनी कंत्राटी वीज कामगार म्हणूनही काम केले. शेतकऱ्यांशी त्यांचा चांगला संबंध असल्याने व ते वेळेवर कामे करीत असल्याने त्यांच्या मृत्यूने गावकरी संतप्त झाले होते. विद्युतपुरवठा बंद केल्यानंतर तो सुरू कसा झाला, याची चौकशी करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे. (वार्ताहर)मी विद्युतपुरवठा बंद करण्याचा परवाना १२ वाजून ५ मिनिटांनी आॅपरेटर मारुती चव्हाण याच्याकडून घेतला असून, चव्हाण याला आपण वीजपुरवठा चालू करण्यास सांगितले नव्हते. तरीही वीजपुरवठा चव्हाण याने सुरु केला.- प्रकाश वावरे, वायरमन महावितरणचा शाखा अभियंता शशिकांत दिघे याने ग्रामस्थांशी उध्दट वर्तन केले. याप्रकरणी मारुती चव्हाण, शशिकांत दिघे, प्रकाश वावरे यांच्यावर कारवाई करुन त्यांना तातडीने निलंबित करावे.- विनायक पाटोळे, शेतकरी