शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

थकीत बिलामुळे हुपरी पाणीपुरवठा योजनेची वीज खंडीत; पाण्यासाठी धावाधाव

By admin | Updated: March 30, 2016 00:14 IST

अडीच कोटी रुपयांचा महसूल जमा करणाऱ्या ग्रामपंचायतीला वार्षिक ३० ते ३५ लाखांच्या वीज बिलासाठी तरतूद कशी करता येत नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

हुपरी : सहा लाख रुपयांच्या थकीत वीज बिल रकमेच्या वसुलीसाठी महावितरण कंपनीने हुपरी (ता. हातकणंगले)च्या नळ पाणीपुरवठा योजनेचा विद्युतपुरवठा बंद केल्याने गावचा पाणीपुरवठा बंद पडला आहे. परिणामी, उन्हाळ्यात पाण्यासाठी धावाधाव करावी लागत आहे. हुपरीला पिण्याचा पाणीपुरवठा करण्यासाठी भारत निर्माण योजनेतून १४ कोटी रुपये खर्चाची नळ पाणीपुरवठा योजना राबविली आहे. पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण होताच योजनेतून पाणीपुरवठा करण्यात येत आहे. दुसऱ्या टप्प्याचे कामही संथ सुरू आहे. शहरासाठी स्वतंत्र पाणीपुरवठा योजना राबविली. मात्र, या योजनेच्या वीज बिलाची तरतूद ग्रामपंचायत प्रशासन ज्या त्यावेळी करीत नसल्याचे अनेकवेळा समोर आले आहे. गेल्या जुलै ते डिसेंबरमधील १२ लाख ५० हजार रुपये वीज बिलाची थकबाकी आठ दिवसांपूर्वीच तेही १४ व्या वित्त आयोगाच्या मिळालेल्या रकमेतून भरली असतानाच जानेवारी ते मार्च अशा तीन महिन्यांचे सहा लाख रुपयांचे बिल थकल्यामुळे सोमवारी दुपारी महावितरण कंपनीने योजनेचा वीजपुरवठा तोडला. अडीच कोटी रुपयांचा महसूल जमा करणाऱ्या ग्रामपंचायतीला वार्षिक ३० ते ३५ लाखांच्या वीज बिलासाठी तरतूद कशी करता येत नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे. जोपर्यंत पाणी बंद होत नाही, तोपर्यंत कोणीही लक्ष देत नाही, असा अनुभव आहे. (वार्ताहर)यापूर्वीची साडेबारा लाख रुपयांची थकबाकी भरली आहे. शहरातूनही तेवढी वसुली न झाल्याने वीज बिल भरायचे राहिले होते. त्याची पूर्तता केली जात असतानाच महावितरण कंपनीने वीजपुरवठा तोडला. योजनेसाठी एक नवीन विद्युत पुरवठा घेण्यात येत असून, थकबाकीही भरणार आहोत. जास्त वेळ पाणीपुरवठा बंद राहणार नाही, याची काळजी घेत आहोत. - दीपाली शिंदे, सरपंच, हुपरी