शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

संचालकांवर अपात्रतेची तलवार!

By admin | Updated: June 30, 2015 23:15 IST

जिल्हा मध्यवर्ती बँक : आरोपपत्राच्या तयारीने आजी-माजी संचालकांत खळबळ

सांगली : सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेतील १५७ कोटी रुपयांच्या नुकसानीप्रकरणी ८९ जणांवर आरोप निश्चित झाल्यानंतर आजी-माजी संचालकांमध्ये खळबळ माजली आहे. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६0 मधील कलम ७३ फ (फ) नुसार विद्यमान संचालकांवर आर्थिक जबाबदारी निश्चित झाल्यानंतर त्यांचे सदस्यत्व रद्द होऊ शकते. त्यामुळे कायद्यातील या तरतुदीची टांगती तलवार आता त्यांच्यावर लटकत आहे. नियमबाह्य कर्जवाटप व एकरकमी परतफेड योजनेतून जिल्हा मध्यवर्ती बँकेचे १५७ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याप्रकरणी तत्कालीन संचालक, मृत माजी संचालकांचे वारस आणि तत्कालीन अधिकारी अशा ८९ जणांवर आरोप निश्चित करण्यात आले आहेत. चौकशी अधिकाऱ्यांकडून येत्या दोन दिवसात नोटिसा काढण्यात येण्याची चिन्हे आहेत. या वृत्ताने आजी-माजी संचालकांसह अधिकाऱ्यांमध्ये खळबळ माजली आहे. आरोप निश्चित झालेल्यांमध्ये विद्यमान संचालक विलासराव शिंदे, प्रा. सिकंदर जमादार, मोहनराव कदम, आ. अनिल बाबर, विशाल पाटील (वारसदार) यांचा समावेश आहे. त्यामुळे विद्यमान संचालकांवरही आता कारवाईची टांगती तलवार लटकत आहे. माजी संचालकांमध्येही अनेक दिग्गज नेत्यांचा समावेश असल्यामुळे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष आता याप्रकरणी होणाऱ्या कारवाईकडे लागले आहे. याप्रकरणी सुरुवातीला १0२ जणांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. यातील १४ माजी संचालकांना वगळण्यात आल्यामुळे आता ८९ जणांवर आरोप निश्चित करण्यात आले आहेत. वगळण्यात आलेल्या १४ जणांमध्येही काही विद्यमान संचालक होते. त्यामुळे वगळण्यात आलेल्या विद्यमान संचालकांना दिलासा मिळाला आहे. चौकशी अधिकारी संपतराव गुंजाळ यांनी आता आरोपपत्र निश्चित करून संबंधितांना नोटिसा काढण्याची तयारी सुरू केली आहे. आरोप निश्चित झाल्यानंतर पुन्हा त्यावर सुनावणी होणार आहे. त्यानंतर संबंधितांवर जबाबदारी निश्चितीची प्रक्रिया सुरू होईल. (प्रतिनिधी)अशी आहे कायद्यातील तरतूद महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६0 मधील कलम ७३ फ (फ) मधील ‘सदस्यत्वासाठी निरर्हता’ या शीर्षकाखाली ई-३ नुसार ज्या व्यक्तीला कलम ७९ किंवा ८८ खाली जबाबदार धरण्यात आले असेल किंवा ८५ खाली चौकशीचा खर्च देण्यास जबाबदार धरण्यात आले असेल, तर तो सदस्य अपात्र ठरू शकतो. त्याचबरोबर ज्या व्यक्तीने पत कर्जाची सहकारी पणन किंवा सहकारी प्रक्रिया यांच्याशी सांगड घालण्यासंदर्भात सहकारी संस्थाविषयक अनुशासनाचा जाणूनबुजून भंग केला असेल तरीही ती व्यक्ती सदस्य म्हणून अपात्र ठरू शकते. आरोपानंतर पुढे काय होणार?जबाबदारी निश्चितीबद्दलची कलम ७२ (२) ची चौकशी पूर्ण झाल्यानंतर आता ७२ (३) नुसार माजी संचालक व अधिकाऱ्यांवर आरोपपत्र निश्चित झाले आहे. त्यावर पुन्हा ७२ (४) नुसार सुनावणी प्रक्रिया, त्यानंतर जबाबदारी निश्चिती आणि वसुलीचे आदेश, अशी ही प्रक्रिया चालणार आहे. असे झाले नुकसानदोन वर्षापूर्वी जिल्हा बँक आर्थिक अडचणीत आल्यानंतर रिझर्व्ह बँकेने प्रशासकाची नियुक्ती केली होती. सहकार कायद्यातील कलम ८३ नुसार चौकशी करण्यात आली. या चौकशीत २१ संस्थांना नियमबाह्य कर्जवाटप करून १५० कोटी व १७ संस्थांना एकरकमी कर्ज परतफेड योजनेतून ७ कोटी ९ लाखांचे नुकसान झाल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. यांचा आहे समावेश माजी मंत्री मदन पाटील, माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील, विशाल पाटील (तिघे वारसदार), आ. विलासराव जगताप, आ. अनिल बाबर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम, दिनकरदादा पाटील, अमरसिंह नाईक, जगन्नाथ मस्के आदी नेत्यांचा समावेश आहे.