शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

मुख्यमंत्र्यांचा राजीनामा घेऊन सरकार बरखास्त करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2018 23:45 IST

सांगली : मराठा समाजाचे आरक्षणाबाबतचे आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न करणारे आणि काकासाहेब शिंदे यांच्या मृत्यूस जबाबदार असणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ राजीनामा द्यावा. सरकार बरखास्त करून मुख्यमंत्र्यांनी मराठा समाज आणि संघटनांची जाहीर माफी मागावी, अशी मागणी मंगळवारी मराठा क्रांती मोर्चाद्वारे सांगलीत जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली.जिल्हाधिकारी निवेदन स्वीकारण्यासाठी गेटपर्यंत न आल्याने ...

सांगली : मराठा समाजाचे आरक्षणाबाबतचे आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न करणारे आणि काकासाहेब शिंदे यांच्या मृत्यूस जबाबदार असणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ राजीनामा द्यावा. सरकार बरखास्त करून मुख्यमंत्र्यांनी मराठा समाज आणि संघटनांची जाहीर माफी मागावी, अशी मागणी मंगळवारी मराठा क्रांती मोर्चाद्वारे सांगलीत जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली.जिल्हाधिकारी निवेदन स्वीकारण्यासाठी गेटपर्यंत न आल्याने आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवरच निवेदन लावले. यावेळी डॉ. संजय पाटील, महेश खराडे, सतीश साखळकर, श्रीरंग पाटील, विलास देसाई, नितीन चव्हाण, अशरफ वांकर, महेश पाटील, उमेश पाटील, अमोल सूर्यवंशी, नानासाहेब कदम, सुनील निकम उपस्थित होते.निवेदनात म्हटले की, मुख्यमंत्र्यांनी पंढरपूरला पूजेसाठी न जाण्याचा निर्णय जाहीर करताना घातपात होण्याची शक्यता वर्तवली. त्यासाठी गुप्तचर विभागाचा हवाला दिला; मात्र ते राज्यातील जनतेची दिशाभूल करीत आहेत. मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला घातपाती ठरवले. आंदोलन करणारे छत्रपतींचे मावळे नसल्याचे वक्तव्य केले. त्यांनी समाजाची व संघटनेची बदनामी केली आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सुरू असणाºया आंदोलनावेळी गंगाखेड तालुक्यात कायगाव टोक येथे गोदावरी नदीत उडी मारून काकासाहेब शिंदे यांनी जलसमाधी घेतली. या मृत्यूला मुख्यमंत्री फडणवीसह जबाबदार आहेत. फडणवीस यांच्यावर ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल करून कारवाई करावी. मराठा समाजाचा अपमान करत जातीय तेढ निर्माण करणाºया फडणवीस यांनी माफी मागावी, आदी मागण्या करण्यात आल्या.कृष्णेत आज जलसमाधी आंदोलनमराठा समाजाच्या आरक्षणासाठी राज्यभर आंदोलन सुरू आहे. काकासाहेब शिंदे यांचे बलिदान वाया जाऊ देणार नाही, अशी शपथ बुधवारी घेण्यात येणार आहे. त्यासाठी सकाळी दहा वाजता सांगलीतील गणपती मंदिरामागील स्वामी समर्थ घाटावर जलसमाधी आंदोलन करण्यात येणार असल्याचे मराठा क्रांती मोर्चातर्फे सांगण्यात आले.कार्यकर्ते-पोलिसांमध्ये वादावादीमराठा क्रांती मोर्चाच्यावतीने प्रमुख दहा कार्यकर्त्यांना निवेदन देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बोलाविण्यात आले. त्यावेळी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री सुभाष देशमुख, आमदार सुधीर गाडगीळ उपस्थित होते. मात्र जिल्हाधिकारी निवेदन घेण्यास उपस्थित नव्हते. दरम्यान, कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या. यावेळी पोलीस व कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला. त्यानंतर कार्यकर्ते बाहेर आले. त्यांनी गेटसमोर जोरदार घोषणा देत ठिय्या मारला. निवेदन घेण्यासाठी जिल्हाधिकाºयांनी बाहेर यावे, अशी मागणी करण्यात आली. मात्र प्रोटोकॉल सोडून ते बाहेर न आल्याने आंदोलकांनी निवेदन गेटवरच लावण्याचा निर्णय घेतला. यादरम्यान परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.