शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

ठराविक कार्यकर्त्यांच्या कोंडाळ्यामुळे धुसफूस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2019 23:48 IST

अशोक पाटील । लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : राष्टÑवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्यासोबत असलेले तेच-तेच कार्यकर्ते आमदार पाटील ...

अशोक पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कइस्लामपूर : राष्टÑवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्यासोबत असलेले तेच-तेच कार्यकर्ते आमदार पाटील यांची मुले प्रतीक आणि राजवर्धन यांच्याभोवतीही दिसतात. त्यामुळे तिसऱ्या फळीतील युवा कार्यकर्त्यांतून संताप व्यक्त केला जात आहे. त्यामुळे युवा पिढी राष्ट्रवादीपासून दुरावू लागली आहे. पक्षातील या धुसफुशीमुळे काहींनी पक्षबदल करून भाजपमध्ये प्रवेश करण्यास सुरुवात केली आहे.राजारामबापू पाटील यांच्या संपूर्ण घराण्यावर निष्ठा असणारे कार्यकर्ते मोजकेच आहेत, तर आ. जयंत पाटील जेव्हापासून राजकारणात सक्रिय आहेत, तेव्हापासून त्यांच्याजवळ असलेले प्रस्थापित कार्यकर्तेच आजही त्यांच्याभोवती दिसतात. नवीन कार्यकर्त्यांना आ. पाटील यांच्याजवळ फिरकू दिले जात नाही. तिसºया फळीतील युवा कार्यकर्त्यांचीही तीच अवस्था आहे. त्यामुळे त्यांनी आ. पाटील यांची मुले प्रतीक आणि राजवर्धन यांच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. परंतु येथेही तीच मंडळी आडवी येत आहेत. त्यामुळे युवक कार्यकर्त्यांनी विरोधी गटातील युवा नेत्यांना जवळ करण्यास सुरुवात केली आहे. परिणामी इस्लामपूर व शिराळा मतदारसंघात निशिकांत पाटील, वैभव शिंदे, गौरव नायकवडी, राहुल महाडिक, सम्राट महाडिक, सागर खोत यांची ताकद वाढू लागली आहे. युवक कार्यकर्त्यांना सध्यातरी येथील राष्ट्रवादीत वाव मिळत नाही. वर्षानुवर्षे ठाण मांडून बसलेल्या पदाधिकाऱ्यांना खुर्च्या सोडाव्याशा वाटत नाहीत. राजारामबापू उद्योग समूहाची तीच अवस्था आहे. विविध संस्थांतील पदाधिकाºयांनी गेली कित्येक वर्षे पदे सोडलेली नाहीत. जे युवक कार्यकर्ते ज्येष्ठांना अडसर ठरू लागले, त्यांना खड्यासारखे बाजूला करण्यातही ही प्रस्थापित मंडळी माहीर आहेत.दोघांभोवती जुन्या नेत्यांचीच गर्दीराजारामबापू पाटील यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र भगतसिंह व जयंत पाटील यांना राजकारणात आणण्यासाठी काही ठराविक कार्यकर्त्यांचा रेटा होता, तर काही ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी कोल्हापूर येथे बैठक घेऊन, या दोघांच्या नावाला विरोध केला होता. जयंत पाटील यांचे राजकीय वारसदार निश्चित नाहीत. मात्र आ. पाटील यांनी प्रतीक आणि राजवर्धन यांना उद्योग समूहाच्या माध्यमातून राजकारणात सक्रिय केले आहे. परंतु त्या दोघांभोवती असलेले जुने कोंडाळे मात्र राजकारणाचा मोकळा श्वास घेऊ देत नाही.