शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

मतदारांत अविश्वास आणि अस्वस्थता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 23:38 IST

शरद जाधव । लोकमत न्यूज नेटवर्क । सांगली : सांगली मतदारसंघातील प्रतिष्ठित-ख्यातनाम कलावंत, साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते या लोकसभा निवडणुकीकडे ...

शरद जाधव ।

लोकमत न्यूज नेटवर्क ।

सांगली : सांगली मतदारसंघातील प्रतिष्ठित-ख्यातनाम कलावंत, साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते या लोकसभा निवडणुकीकडे कशापद्धतीने पाहतात, त्यांच्या नजरेतून कोणते महत्त्वाचे मुद्दे चर्चिले जायला हवेत, याचा आढावा घेणारी ही मुलाखत...साहित्यिक, अभ्यासक म्हणून तुम्ही सध्याच्या निवडणुकीच्या वातावरणाकडे कसे पाहता?पहिल्या निवडणुकीपासून मला अनुभव आहे. पहिली निवडणूक सोडली तर, प्रत्येक निवडणुकीत मतदानाचा हक्क बजाविला आहे. आजच्या मतदारांमध्ये प्रकर्षाने अस्वस्थता दिसून येते आहे. अविश्वासाचे वातावरण वाढत आहे. सर्वच घटकांमध्ये अस्वस्थता व त्याबद्दलचा विश्वास वाटत नसल्याचे या निवडणुकीतच दिसून येत आहे. साहित्यिक म्हणून हे अस्वस्थ करणारे आहे.लोकसभा निवडणुकीत कोणते महत्त्वाचे मुद्दे असायला हवेत?सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शिक्षणाचा पाया अधिक भक्कम करण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. शिक्षणासाठी भरीव तरतूद व क्षेत्रातील अडचणी दूर करण्यासाठी प्रत्यक्षात कृती होताना दिसत नाही. प्राथमिक शिक्षणाचा पाया खूपच कमकुवत आहे. डिजिटलायझेशनकडे लक्ष देताना श्रम आणि शिक्षणाची सांधेजोड होताना दिसत नाही. शिक्षणाबद्दल खूप मोठी अनास्था असून, शिक्षण घेतलेल्यांनी श्रम करायचेच नाहीत, असा समज निर्माण झालेला आहे. शिक्षण क्षेत्राला अग्रस्थान हवे.तुमच्या क्षेत्राशी निगडित मुद्द्यांना राजकीय पक्ष किती महत्त्व देतात?भाषिक प्रश्न अद्यापही कायम आहेत. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला जावा, याची अनेक वर्षांपासूनची मागणी असली तरी, त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. संशोधनासाठी निरामय वातावरण मिळत नसून, त्यात सवंगपणा आला आहे. विद्यापीठस्तरावर संशोधनात सुमारपणा आला आहे. कसदार साहित्य निर्माण होताना दिसत नाही आणि प्रामाणिक संशोधकांना शासकीय पातळीवर दडपण सहन करावे लागत आहे.नवीन मतदारांनाकाय आवाहन कराल?प्रत्येक पिढीच्या समस्या वेगळ्या आहेत. समाजातील अनेक स्तरावर कार्यरत तरूणांच्या काही अपेक्षा आहेत. त्या पूर्ण करण्यासाठी मतदान जरूर करावे. सन्मानाने जगण्याची प्रेरणा मिळण्यासाठी मतदान करावे.