शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

आपत्ती व्यवस्थापनाच्या सरावास मंडळांना परवानगी द्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:17 IST

सांगली : परवानगीशिवाय खासगी बोटींना नदीपात्रात फिरण्यास महापालिका आयुक्तांनी बंदी घातल्यानंतर शहरातील बाेट क्लब व विविध मंडळांच्या कार्यकर्त्यांनी नाराजी ...

सांगली : परवानगीशिवाय खासगी बोटींना नदीपात्रात फिरण्यास महापालिका आयुक्तांनी बंदी घातल्यानंतर शहरातील बाेट क्लब व विविध मंडळांच्या कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. आपत्ती व्यवस्थापनाच्या तयारीसाठी मंडळांना परवानगी द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

विसावा मंडळाचे अध्यक्ष संजय चव्हाण म्हणाले की, महापुराच्या काळात शहरातील बोट क्लब, जलतरण संस्था व विविध मंडळांचे कार्यकर्ते प्रशासनाला मदत करीत असतात. येथील अनेक मंडळांचा आपत्ती व्यवस्थापनातील योगदानाबद्दल शासनाने गौरवही केला आहे. दरवर्षी पावसाळ्यात बोटी पाण्यात उतरवून आपत्ती व्यवस्थापनाचा सराव करावा लागतो. सराव न करता आपत्तीचे व्यवस्थापन करणार तरी कसे, त्यामुळे हा सराव महत्त्वाचा असतो. कोणतीही मंडळे अकारण नदीत बोटी आणत नाहीत.

महापालिकेने अचानकपणे परवानगीशिवाय नदीत बोटी आणण्यास केलेला मज्जाव चुकीचा आहे. अशामुळे आपत्ती व्यवस्थापनातील मंडळांच्या सहभागाला अडचणी येतील. मंडळांचे महापुरातील योगदान अत्यंत महत्त्वाचे असते. कर्तव्यभावनेने ते हे काम करीत असतात. त्यामुळे त्यांना आपत्ती व्यवस्थापनाचा सराव करण्यास अडचण करू नये. त्यांना मोकळीक द्यावी, अशी मागणी चव्हाण यांनी केली आहे.

चौकट

स्वखर्चाने करतात मदत

आपत्ती व्यवस्थापनात मदत करणारी मंडळे स्वखर्चाने यात उतरत असतात. शासनाकडून कोणत्याही मदतीच्या अपेक्षेविना गेल्या काही वर्षांपासून ते याकामी मदत करीत आहेत, असे चव्हाण म्हणाले.