शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

संजयनगरमध्ये सार्वजनिक शौचालयातील मैला थेट गटारीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:28 IST

संजयनगर : सांगली शहरातील संजयनगरमधील डॉक्टर लिमये रोड येथील महापालिका सार्वजनिक शौचालयातील मैला गेल्या अनेक दिवसांपासून थेट गटारीत जात ...

संजयनगर : सांगली शहरातील संजयनगरमधील डॉक्टर लिमये रोड येथील महापालिका सार्वजनिक शौचालयातील मैला गेल्या अनेक दिवसांपासून थेट गटारीत जात आहे. येथील शौचालयाची महापालिकेने दोन वेळा दुरुस्ती करूनही पुन्हा मैला गटारीत जात असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

महापालिका क्षेत्रात सध्या सर्वत्र स्वच्छता अभियान सुरू आहे. संजयनगर येथील डॉ. लिमये रोड परिसरात महानगरपालिकेची चार सार्वजनिक शौचालये आहेत. या शौचालयातून मैला थेट गटारीत जात आहे. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. आरोग्य विभागाने याठिकाणी वारंवार दुरुस्ती करूनही मैला बाहेर येणे थांबत नाही. येथील काम व्यवस्थित झाले नसल्याने मैला बाहेर पडत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

या परिसरामध्ये घाणीचे साम्राज्य निर्माण झाल्याने दुर्गंधी पसरली आहे. डासांचे प्रमाण वाढले आहे. नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेऊन शौचालयाची दुरुस्ती करण्याबाबत अधिकाऱ्यांना सूचना द्याव्यात, अशी मागणी नागरिकांतून होत आहे

चौकट

चार वेळा दुरुस्ती; लाखाेंचा खर्च

आयुक्त नितीन कापडणीस यांनी पदभार स्वीकारल्यानंतर शहरात स्वच्छता अभियान सुरू असताना दोन वेळा लाखो रुपये खर्च करून या शौचालयाची दुरूस्ती केली आहे. तरीही मैला बाहेर पडत आहे. यापूर्वीही अजित कारचे, नंतर रवींद्र खेबुडकर आयुक्त असतानाही दाेनवेळा या शाैचालयाची दुरुस्ती झाली आहे. गेल्या १७ वर्षांमध्ये चारवेळा या शौचालयाची दुरुस्ती झाली आहे. हे काम चालू असताना बांधकाम विभागाचे कोणीही अधिकारी फिरकले नसल्याने दुरुस्तीचे काम निकृष्ट झाल्याचा नागरिकांचा आराेप आहे. शौचालयाचे दरवाजेही मोडले आहेत.