शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

संचालक न्यायालयात जाणार

By admin | Updated: January 24, 2016 00:41 IST

जिल्हा बँक निवडणूक प्रकरण : शासन निर्णयाबद्दल संताप; राजकीय डाव : जमादार

 सांगली : शासनाने सहकारी बँकांच्या संचालकांबाबत घेतलेला निर्णय म्हणजे राजकीय डाव आहे, अशी टीका करतानाच या निर्णयाविरोधात न्यायालयीन लढाई लढण्याचा निर्णय शनिवारी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या आजी-माजी संचालकांनी घेतल्याची माहिती संचालक प्रा. सिकंदर जमादार यांनी दिली. गेल्या दहा वर्षांत गैरकारभारामुळे बरखास्तीची कारवाई झालेल्या जिल्हा बँका व नागरी बँकावरील संचालकांना दहा वर्षे निवडणूक बंदी घालण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला होता. या अध्यादेशावर राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी शिक्कामोर्तब करीत वटहुकूम काढला. त्यामुळे २०१२ मध्ये बरखास्त झालेल्या संचालक मंडळाला दहा वर्षे अपात्र ठरविण्यात आले आहे. यामध्ये शिवसेनेचे आमदार अनिल बाबर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार विलासराव शिंंदे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम, प्रा. सिकंदर जमादार, माजी अध्यक्ष बी. के. पाटील, माजी उपाध्यक्ष महेंद्र लाड यांचा समावेश आहे. या निर्णयाविरोधात न्यायालयीन लढाई लढण्याचा निर्णय विद्यमान संचालकांसह काही माजी संचालकांनी घेतला आहे. विभागीय सहनिबंधकांनी नोटीस बजावल्यानंतर उच्च न्यायालयात यासंदर्भात याचिका दाखल करण्यात येणार आहे. याबाबत प्रा. जमादार म्हणाले की, अद्याप आम्हाला नोटिसा दिलेल्या नाहीत. तरीही शासनाने काढलेला अध्यादेश पाहता हा निर्णय म्हणजे राजकीय डाव आहे. चुकीच्या पद्धतीने हा निर्णय घेतला गेला आहे. कोणत्याही गैरव्यवहाराची रीतसर चौकशी करावी. त्यामध्ये दोषी असणाऱ्यांना अपात्र ठरवावे. चौकशी न करता सरसकट सर्व संचालकांना या कारवाईत समाविष्ट करणे योग्य नाही. संबंधित संचालक मंडळ बरखास्त झाले असले तरी, अनेकांनी वादग्रस्त व बेकायदेशीर कर्ज प्रकरणांना लेखी अथवा तोंडी विरोध केला आहे. ज्यांनी विरोध नोंदवून कर्तव्य पार पाडले, त्यांनाही या निर्णयाचा फटका बसणार आहे. त्यामुळे निर्णयात प्रचंड त्रुटी आहेत. सर्वजण यात भरडले जाणार आहेत. त्यामुळे आम्ही शेवटपर्यंत या निर्णयाविरोधात लढत राहू. न्यायालयात याविषयी योग्य दाद मागितली जाईल. दरम्यान, शासनाकडून होणाऱ्या कारवाईकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. विभागीय सहनिबंधक राजेंद्रकुमार दराडे यांच्याकडून या सर्वांना सोमवारी अपात्रतेच्या व निवडणूक बंदीच्या नोटिसा बजाविण्यात येणार आहेत. त्यानंतर राजकीय हालचाली गतिमान होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)