शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

दिनकर पाटलांना राष्टÑवादीचे अभय

By admin | Updated: May 25, 2014 00:47 IST

भाजपप्रेम उफाळले : निरीक्षकांकडे कोणीही तक्रार केली नाही

सांगली : भाजप उमेदवाराबद्दलच्या प्रेमाची जाहीर वाच्यता केल्यानंतर जत तालुक्यातील राष्टÑवादीचे नेते विलासराव जगताप यांची राष्टÑवादीतून हकालपट्टी झाली होती. उमेदवार व भाजपच्या प्रेमाचे मोठमोठे डिजिटल फलक झळकविणारे राष्टÑवादीचे शहर जिल्हाध्यक्ष दिनकर पाटील यांना मात्र स्थानिक पदाधिकार्‍यांनी अभय दिल्याचे स्पष्ट होत आहे. जिल्ह्याचे निरीक्षक अशोक स्वामी यांच्याकडे दिनकर पाटील यांच्याबद्दलची एकही तक्रार दाखल झाली नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. संजय पाटील, विलासराव जगताप यांच्यावर कारवाईसाठी दाखविण्यात आलेली तत्परता दिनकर पाटील यांच्याबाबत दिसत नसल्याने कार्यकर्त्यांना आश्चर्य वाटत आहे. जिल्हाध्यक्ष, पक्षनिरीक्षक यांच्यास्तरावर दिनकर पाटील यांना कोणतीही विचारणा करण्यात आली नाही. दिनकर पाटील यांनीही भाजप प्रवेशाबाबत अद्याप निर्णय घेतला नाही. उमेदवारी मिळाली तरच भाजप प्रवेशाचे दिनकर पाटील यांचे गणित असल्याची चर्चा आहे. राष्टÑवादीचे पद असूनही त्यांनी भाजपचे खासदार संजय पाटील व नरेंद्र मोदी यांच्या अभिनंदनाचे फलक झळकविले आहेत. ‘अबकी बार दिनकरतात्या’ अशा वाक्यातून त्यांनी भाजप प्रवेशाचे केवळ संकेत दिले आहेत. तरीही त्यांच्याबाबत पक्षीय पातळीवर मौन बाळगण्यात आले आहे. विलासराव जगताप यांनी पत्रकार परिषदेत संजय पाटील यांना पाठिंबा जाहीर केल्याबरोबर दोन दिवसांत त्यांना राष्टÑवादी जिल्हाध्यक्षांनी नोटीस काढली. त्यानंतर जलदगतीने कारवाईसुद्धा झाली. आर. आर. पाटील यांच्यावर टीका केल्यानंतर संजय पाटील यांच्याबाबतही पक्षाने आक्रमक भूमिका स्वीकारली होती. अशीच भूमिका राष्टÑवादीचे माजी शहर जिल्हाध्यक्ष इद्रिस नायकवडी यांच्याबाबतही पक्षाने घेतली होती. दिनकर पाटील यांनी भाजपचा उघडपणे प्रचार करून भाजपच्या अभिनंदनाचे फलकही झळकविले. तरीही जिल्हाध्यक्ष व पक्षनिरीक्षक तक्रारीची वाट पहात आहेत. शहरात नागरिकांना दिसणारे डिजिटल फलक पक्षाच्या पदाधिकार्‍यांना दिसत नसल्याचे बोलले जात आहे. (प्रतिनिधी) पक्षीय स्तरावर तक्रारींकडे दुर्लक्ष दिनकर पाटील यांच्यावरील कारवाईबाबत पक्षनिरीक्षक अशोक स्वामी यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, अद्याप माझ्याकडे एकही तक्रार आली नाही. कोणी याबाबत माहितीसुद्धा दिलेली नाही. केवळ प्रसारमाध्यमांमधून या गोष्टी कळाल्या आहेत. दोन दिवसांपूर्वी जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे यांनी दिनकर पाटील यांच्या कृतीबाबत निरीक्षकांकडे तोंडी तक्रार केल्याचे सांगितले होते. त्यामुळे पक्षीय स्तरावर दिनकर पाटील यांना अभय देण्यात येत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.