आष्टा : येथील आष्टा पश्चिम भाग विकास सोसायटीच्या अध्यक्षपदी दिनकरराव बसुगडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. संस्थेचे संस्थापक आष्टा शहर विकास आघाडीचे नेते वैभव शिंदे, उद्योगपती सुभाष देसाई यांच्याहस्ते नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी उपाध्यक्ष मारुती गणू रेवले पाटील, राजू इनामदार, माणिक शिंदे, प्रदीप ढोले, साजिद इनामदार, संपत पाटील, सदाशिव सूर्यवंशी, सचिव प्रकाश बसुगडे, विकास माळी, दत्तराज हिप्परकर, सागर जगताप प्रमुख उपस्थित होते.
फोटो: १७०१२०२१- आष्टा सोसायटी सत्कार न्यूज
आष्टा पश्चिम भाग विकास सोसायटीचे नूतन अध्यक्ष दिनकरराव बसुगडे यांचा वैभव शिंदे यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी सुभाषराव देसाई, मारुती रेवले पाटील, प्रकाश बसुगडे, विकास माळी, राजू इनामदार आदी उपस्थित होते.