शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

तासगाव भाजप युवा मोर्चा अध्यक्षपदी दिग्विजय पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:27 IST

तासगावमध्ये उच्चांकी मतांनी प्रभाग क्र ९ चे उमेदवार तसेच लोकनियुक्त नगराध्यक्षांना शहरात सर्वाधिक ९०३ मतांची आघाडी देऊन नगराध्यक्षपदाचा ...

तासगावमध्ये उच्चांकी मतांनी प्रभाग क्र ९ चे उमेदवार तसेच लोकनियुक्त नगराध्यक्षांना शहरात सर्वाधिक ९०३ मतांची आघाडी देऊन नगराध्यक्षपदाचा किंगमेकर होण्याची किमया त्यांनी केली आहे. दिग्विजय पाटील विविध सामाजिक उपक्रमांमध्ये अग्रेसर असतात. वृक्षारोपण, रक्तदान शिबिर, एसटी बस थांबा उभारणी, भिलवडी नाका चौक येथे सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे, गणेशोत्सवातून सामाजिक देखावे, दहीहंडी उत्सवातून युवकांचे संघटन, वयोवृद्धांसाठी विरंगुळा केंद्र, भिलवडी नाका येथे रास्त किमतीमध्ये खासदार शुद्ध पेयजल प्लांटच्या उभारणीसाठी त्यांचा पुढाकार असताे. बॉक्सर ग्रुपच्या माध्यमातून युवकांसाठी अत्याधुनिक व्यायाम शाळा, तसेच स्पर्धा परीक्षा अभ्यासिकेचे काम सुरू आहे. वृक्षदान, शहरात डस्टबिन वितरण, शहरात विविध ठिकाणी नागरिकांना बसण्यासाठी बेंच उपलब्ध करून दिले. भिलवडी आणि सांगली येथील पूरग्रस्त बांधवांना मदत केली.

तासगाव शहरात डास निर्मूलन करण्यासाठी औषध फवारणीसाठी त्यांचा पाठपुरावा असताे. वरचे गल्ली परिसर आणि तासगाव शहरांमध्ये संजयकाकांच्या राजकीय जडणघडणीमध्ये तरुणांमध्ये दिग्विजय पाटील यांचा सिंहाचा वाटा आहे. आपल्या कामातून आणि कृतीतून लोकांच्या मनामध्ये त्यांनी वेगळा ठसा उमटवला आहे.

या कामांची दखल घेत खासदार संजयकाका यांनी भाजप युवा मोर्चाच्या तासगाव तालुकाध्यक्षपदी दिग्विजय पाटील यांची निवड केली आहे. यावेळी युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष रोहित पाटील, जिल्हा सरचिटणीस सुंदर पाटील, उदयोजक विनय जिरगे उपस्थित होते.

चौकट :

तालुक्यातील युवकांचे प्रश्न सोडवणार

युवा मोर्चा तालुकाध्यक्ष म्हणून तासगाव तालुक्यातील तरुणांचे संघटन चांगल्या पद्धतीने करणार आहे. नुसतं राजकारणच नाही, तर तरुणांचे सामाजिक क्षेत्रात योगदान वाढावं, त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, रोजगार, शैक्षणिक अडचणी यांसह तरुणांच्या सर्व प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी पदाचा वापर करणार असल्याची प्रतिक्रिया दिग्विजय पाटील यांनी दिली.

फाेटाे : येणार आहे