शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

डिग्रज, तुंगच्या शेतकऱ्यांना १३ लाखांचा गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:28 IST

सांगली : ऊसतोड मजूर पुरवण्याच्या नावाखाली मौजे डिग्रज आणि तुंग येथील दोन शेतकऱ्यांना १३ लाख ३५ हजार रुपयांना गंडा ...

सांगली : ऊसतोड मजूर पुरवण्याच्या नावाखाली मौजे डिग्रज आणि तुंग येथील दोन शेतकऱ्यांना १३ लाख ३५ हजार रुपयांना गंडा घालण्यात आला. याबाबत दोन्ही शेतकऱ्यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार विजापूर व जत तालुक्यातील दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हा दाखल झालेल्यात मुकादम आमसिद्ध खंडू बरकाडे (रा. कन्नूर, जि. विजापूर) व मडाप्पा मायाप्पा हावगोंडी (रा. शेड्याळ, ता. जत) या मुकादमांचा समावेश आहे.

पोलिसांनी दिलेली माहितीनुसार फिर्यादी राजगोंडा अण्णा मगदूम (वय ५३, रा. कर्नाळ रस्ता, मौजे डिग्रज) यांना ऊसतोड मजूर पुरवतो, असे सांगून बरकाडे याने विश्‍वास संपादन केला. त्यानंतर मगदूम आणि बरकाडे यांच्यात करार झाला. त्यानुसार मगदूम यांनी बरकाडेला मजूर पुरवण्यासाठी चार लाख ८५ हजार २७१ रुपये दिले. पैसे मिळाल्यानंतर बरकाडेने मजूर पुरवले नाहीत. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर मगदूम यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. तर दुसऱ्या घटनेत रावसाहेब केराप्पा सरगर (वय ४०, रा. तुंग, ता. मिरज) यांना ऊसतोड मजूर पुरवण्याच्या बहाण्याने हावगोंडी याने आठ लाख ५० हजार रुपये घेतले. पैसे मिळाल्यानंतर हावगोंडी याने सरगर यांना मजूर पुरवले नाहीत. सरगर यांनी मजूर पुरवण्यासाठी हावगोंडीकडे तगादा लावला. मात्र, त्याने मजूर पुरवले नाहीत. यामुळे सरगर यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.