गव्हाण : गव्हाण (ता. तासगाव) येथे जिल्हा मध्यवर्ती बँक व नाबार्ड यांच्या संयुक्त विद्यमाने डिजिटल साक्षरता मेळावा झाला. या मेळाव्याचे उद्घाटन ग्रामपंचायत सदस्य गौरी पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. बँकेचे कृषी सहाय्यक अमित लुगडे व नितीन पाटील यांनी बँक राबवत असलेल्या विविध योजनांची यावेळी माहिती दिली.
कार्यक्रमाला गव्हाण शाखेचे फिल्ड ऑफिसर एन. बी. पाटील, शाखाधिकारी अरुण पाटील, ज्युनिअर असिस्टंट अक्षय पाटील, अजित भोसले, सोसायटीचे माजी अध्यक्ष शरद पवार, पोलीस पाटील शिवाजी पाटील, कोतवाल अर्चना जाधव, एकनाथ पाटील, राजू यादव तसेच गावातील विविध बचत गटांमधील महिला, ग्रामस्थ उपस्थित होते.