शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीच्या मेळाव्यात धुमश्चक्री

By admin | Updated: June 10, 2016 00:28 IST

दोघे जखमी : एकमेकांना पाठलाग करून चोपले; खुर्च्या, खिडक्यांची मोडतोड

सांगली : येथील दीनानाथ नाट्यगृहात आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रवादीच्या मेळाव्यात जेवण करण्यावरून कार्यकर्त्यांच्या दोन गटांत जोरदार हाणामारी झाली. खुर्च्या, लाकडे हातात घेऊन एकमेकांना पाठलाग करून चोपण्यात आले. दहा मिनिटे सुरू असलेल्या या मारामारीत दोघे गंभीर जखमी झाले. गुरुवारी दुपारी चार वाजता ही घटना घडली. कार्यकर्त्यांनी नाट्यगृहातील खिडक्यांच्या काचा, प्रवेशद्वारांसह खुर्च्यांची मोडतोड केली. रात्री उशिरापर्यंत या घटनेची शहर पोलिस ठाण्यात नोंद नव्हती.माजी मंत्री आ. जयंत पाटील यांच्या उपस्थितीत सांगली विधानसभा क्षेत्रातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा गुरुवारी आयोजित करण्यात आला होता. यानिमित्त स्नेहभोजनही आयोजित केले होते. दुपारी बारा वाजता मेळावा सुरू होणार होता, पण कार्यकर्ते सकाळी दहापासूनच मेळाव्यासाठी हजेरी लावत होते. जयंत पाटील दुपारी तीन वाजता कार्यक्रमस्थळी आले. पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नाट्यगृह तुडुंब भरले होते. नाट्यगृहाच्या आवारातही कार्यकर्ते थांबून होते. मेळाव्याच्या अंतिम टप्प्यात दुपारी चार वाजता जयंत पाटील यांचे भाषण सुरू होते. हे भाषण संपल्यानंतरच सर्वांनी स्नेहभोजन घ्यावे, अशी सूचना संयोजकांनी केली होती, पण कार्यकर्त्यांना धीर धरता आला नाही. पाटील यांचे भाषण सुरू असतानाच काही कार्यकर्ते बाहेर आले. त्यांनी आचाऱ्यास जेवण वाढण्याची विनंती केली, पण त्याने नकार दिला. काही कार्यकर्त्यांनी या आचाऱ्याला तेथून हटवून जेवणाच्या व्यवस्थेचा ताबा घेतला. जेवण (पान १० वर)एक बेशुद्ध : लाकडाने मारहाणमारामारीत दोघे गंभीर जखमी झाले आहेत. यातील शुभम राजाराम गोसावी (वय १८, रा. अहिल्यानगर झोपडपट्टी, सांगली) हा उपचारार्थ सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल झाला होता, पण पोलिसांत गुन्हा दाखल करायचा का नाही, असा प्रश्न वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला विचारल्यानंतर तो तेथून खासगी रुग्णालयात गेला. रुग्णालयातील दप्तरी, त्याला गणपती पेठ येथे दहा ते पंधराजणांनी मारहाण केली असल्याची नोंद आहे. याशिवाय आणखी एका कार्यकर्त्याला लाकडाने बेशुद्ध होईपर्यंत मारहाण करण्यात आली. त्याला उपचारासाठी कोठे दाखल केले, याची माहिती मिळू शकली नाही. या घटनेची रात्री उशिरापर्यंत शहर पोलिसांत नोंद नव्हती. जयंत पाटील यांचा काढता पायमेळावा अंतिम टप्प्यात आल्यानंतर कार्यकर्त्यांच्या दोन गटांत हाणामारी सुरू झाली, पण मेळावा संपवूनच जयंत पाटील बाहेर आले. नाट्यगृहाच्या प्रवेशद्वारावर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी असल्याने पाटील नाट्यगृहातून भारती विद्यापीठाकडे जाणाऱ्या बोळातील रस्त्याने बाहेर निघून गेले. त्यांची मोटार नाट्यगृहाच्या आवारात होती. पोलिस ठाण्याजवळ त्यांनी मोटार बोलावून घेऊन ते पुढील कार्यक्रमासाठी रवाना झाले.