शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

सांगोले गावात स्वच्छतेतून साजरी होतेय ‘धुळवड’

By admin | Updated: March 14, 2017 00:28 IST

ग्रामस्थांचा सहभाग : पंधरा वर्षांपासूनचा उपक्रम : अनेक ग्रामस्थांचा सहभाग, शंभर टक्के व्यसनमुक्त गाव

दिलीप मोहिते -- विटा --शंभर टक्के व्यसनमुक्त असलेल्या खानापूर तालुक्यातील सांगोले गावाने धुलीवंदनाला हातात झाडू घेऊन गाव स्वच्छ करण्याचा उपक्रम गेल्या पंधरा वर्षांपासून सुरू ठेवला आहे. सर्व ग्रामस्थ रस्ते, मंदिरे, सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ करीत आहेत. सांगोले गावाने ‘आदर्श सरपंच’ पुरस्कारप्राप्त सुशांत देवकर यांच्या पुढाकाराने संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात सातत्य कायम ठेवले आहे. प्रत्येक रविवारी लोकसहभागातून गावात स्वच्छता केली जाते. राज्यातील पहिले निर्मलग्राम होण्याचा बहुमानही सांगोलेने पटकाविला होता. विविध उपक्रम तसेच सामाजिक उपक्रमांतून प्रबोधन करून बदल करण्यात आले आहेत.गाव गेल्या अनेक वर्षापासून शंभर टक्के व्यसनमुक्त आहे. पंधरा वर्षांपूर्वी सुशांत देवकर यांच्यासह सर्व सहकाऱ्यांनी आणि ग्रामस्थांनी धुलीवंदन तथा धुळवडीचा सण ग्रामस्वच्छतेच्या माध्यमातून साजरा करण्याचा संकल्प केला. सोमवारी धुलीवंदनाला भल्या पहाटे सरपंच देवकर व ग्रामस्थ हातात झाडू घेऊन रस्त्यावर उतरले होते. सकाळी अकरापर्यंत गावातील रस्ते, धार्मिक स्थळे, सार्वजनिक चौक, समाजमंदिरांची स्वच्छता करून धुळवड साजरी केली.संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात गावाने सातत्य ठेवले आहे. २००२ पासून सर्व ग्रामस्थ सार्वजनिक ठिकाणची स्वच्छता करूनच धुलीवंदन सण साजरा करतात. गेल्या पंधरा वर्षांपासून हा उपक्रम सुरू असून, लोकसहभागामुळेच हे शक्य झाले आहे.- सुशांत देवकर, आदर्श सरपंच, सांगोले