शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई गोवा महामार्गांवर LPG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
2
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
3
दहशतवादी आणि पीडित एकाच तराजूत नाहीच..; जयशंकर यांचा पुन्हा एकदा जगाला स्पष्ट संदेश
4
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
5
जनता त्यांना नाकारते, ते जनादेशाला नाकारतात! देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींना टोला
6
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
7
कोलंबियात भाषण देताना राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या डोक्यात झाडली गोळी; हल्लेखोराला अटक
8
Bengaluru Stampede: कर्नाटक सरकारने भरपाईची वाढवली रक्कम; मृतांच्या कुटुंबियांना देणार २५ लाख रुपये
9
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
10
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
11
शैक्षणिक दाखले, शपथपत्रासाठी स्टॅम्प पेपरची मागणी नियमबाह्य! महसूलमंत्री बावनकुळे यांची अधिकाऱ्यांना तंबी
12
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
13
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
14
गृहप्रकल्पाच्या साइट प्रमोशनसाठी ड्रोन उडविले, अंधेरी येथे तिघे जण पोलिसांच्या ताब्यात
15
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
16
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
17
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
18
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
19
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
20
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले

थकबाकीदारांच्या घरासमोर ढोल-ताशे

By admin | Updated: March 11, 2015 00:04 IST

महापालिकेची कारवाई : दिवसभरात ३५ लाखांची घरपट्टी वसूल

सांगली : महापालिकेच्या घरपट्टीची थकबाकी वसूल करण्यासाठी आज, मंगळवारपासून थकितांच्या घरासमोर ढोल-ताशे वाजविण्यात आले. सांगली, मिरज आणि कुपवाड या तीन शहरात वाजंत्रीच्या पाच पथकांद्वारे वसुलीची मोहीम हाती घेण्यात आली आहे. दिवसभर या पथकांनी याद्वारे साडेसहा लाखांची वसुली केली, तर एकूण ३५ लाखांची थकबाकी वसूल झाली आहे. ही मोहीम आणखी तीव्र करणार असल्याचे करनिर्धारक व संकलक सुनील नाईक यांनी सांगितले. महापालिकेच्या घरपट्टीची ५० कोटीपेक्षा अधिक थकबाकी आहे. वारंवार नोटिसा बजावूनही कर वसुलीला नागरिकांकडून प्रतिसाद मिळत नाही. दरवर्षी थकबाकीचा आकडा वाढतच जात आहे. थकबाकी वसुलीसाठी वाजंत्री वाजविण्याचे आदेश महापौर विवेक कांबळे यांनी प्रशासनाला दिले होते. त्यानुसार प्रशासनाने आजपासून ही कारवाई सुरू केली. तीन शहरात पाच पथके तयार करण्यात आली आहेत. त्यात सांगलीत दोन, मिरजेत दोन व कुपवाडला एका पथकाद्वारे वसुली सुरू केली. थकबाकीदारांच्या घरासमोर ढोल-ताशे वाजविण्यात आले. सांगलीतील शंभरफुटी, शामरावनगर, रतनशीनगर, जामवाडी परिसरात वसुली मोहीम राबविण्यात आली. पालिकेचे पथक वाजंत्रीसह दारात येताच थकबाकीदारांकडून विनवण्या होत होत्या. दारात ढोल-ताशे वाजवू नका, आम्ही कर भरतो, असा प्रतिसादही मिळत होता. सांगलीतील पथकाकडून दिवसभरात २० थकबाकीदारांकडून सहा लाख ६६ हजाराची वसुली झाली. दिवसभरात ३० लाख ८४ हजारांची घरपट्टी वसूल झाली. त्यात सांगलीतून २२.५६ लाख, मिरजेतून ७ लाख, तर कुपवाडमधील १.१९ लाख रुपयांचा समावेश आहे. (वार्ताहर)२ हजार जणांना नोटिसामहापालिकेने दहा हजारपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या मालमत्ताधारकांवर लक्ष केंद्रित केले आहे. तीनही शहरातील दहा हजारापेक्षा अधिक थकबाकी असलेल्या दोन हजार मालमत्ताधारकांना नोटिसा बजाविल्या आहेत. पहिल्या टप्प्यात या मालमत्ताधारकांच्या दारात ढोल-ताशे वाजविले जाणार आहेत. त्याशिवाय पाणी कनेक्शन तोडण्याची कारवाईही हाती घेतली आहे. आज, मंगळवारी दोन पाणी कनेक्शन्स तोडण्यात आली.