शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

बुधगावमध्ये दोन गटांत धुमश्चक्री

By admin | Updated: December 11, 2014 23:41 IST

गटातील संघर्ष टोकाला : नंग्या तलवारी, रिव्हॉल्व्हरच्या माध्यमातून गावात दहशत

बुधगाव : बुधगाव (ता. मिरज) येथे काल किरकोळ कारणावरून झालेल्या बाचाबाचीनंतर आज दोन गट आमने-सामने आले. शिवप्रेमी व युवा स्वराज्य मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये धुमश्चक्री झाली. दोन्ही गटांकडून काठ्या, लोखंडी गज, नंग्या तलवारी, रिव्हॉल्व्हरसह दहशत माजविण्याचा प्रयत्न झाला. आज एका दुकानावर झालेल्या दगडफेकीत सुमारे २००० रुपयांचे नुकसान झाले.काल गाडी घासून गेल्याच्या कारणावरून शिवप्रेमी आणि युवा स्वराज्य मंडळाच्या दोन कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. याचे पर्यवसान मारहाणीत झाले. यानंतर दोन्ही मंडळांचे कार्यकर्ते काठ्या, लोखंडी गज घेऊन आमने-सामने आले. गावातील काही मंडळींनी मध्यस्थी करून हे प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला. परंतु, दोन्ही गटातील संघर्ष मिटला नाही, आज (गुरुवारी) रात्री आठच्या सुमारास गावात पोलीस येऊन गेल्यानंतर दोन्ही गट पुन्हा काठ्या, लोखंडी गज, नंग्या तलवारी, रिव्हॉल्व्हरसह आमने-सामने आले. हा प्रकार पाहून सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हा प्रकार नवजीवन चौकात घडला. यावेळी येथील सुकुमार टिंगरे यांचे आदित्य डिस्ट्रिब्युटर्स अ‍ॅण्ड जनरल स्टोअर्स हे दुकान लोखंडी गजाने फोडण्यात आले. दुकानातील सुमारे दोन हजार रुपयांच्या काच साहित्याचे नुकसान झाले. रात्री उशिरापर्यंत हा धुमाकूळ सुरूच होता. सांगली ग्रामीण पोलिसांना घटनेची माहिती मिळाल्यानंतर बुधगावमध्ये पोलीस बंदोबस्त वाढविला आहे. दरम्यान, पोलिसांनी दोन्ही गटातील कार्यकर्त्यांवर कडक कारवाईची जनतेतून मागणी होत आहे. (वार्ताहर)दोन दिवसापासून गावात तणावदोन दिवसांपासून गावातील नवजीवन चौक, वटसावित्री चौक याठिकाणी अंधार पडला की, हजारो युवक गोळा झालेले दिसतात. त्यामुळे गावाबरोबरच परिसरातही या घटनेचे पडसाद उमटत आहेत.बुधवारी झालेल्या मारामारीत शिवप्रेमी मंडळाच्या कार्यकर्त्याच्या एका दुचाकीचे नुकसान मोठ्याप्रमाणात केले आहे.दोन्ही गटातील कार्यकर्त्यांकडून लोखंडी गज, नंग्या तलवारी, रिव्हॉल्व्हरसह गावात दहशत माजवण्याचा प्रयत्न केला जात आहे. यामुळे गावातील सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.पोलिसांनी दोन्ही गटावर कठोर कारवाई करण्याची गरज आहे.