शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

धनगरी ढोलांचा मंत्रालयासमोर गजर करणार: शेंडगे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2018 23:15 IST

सांगली : धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न पहिल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत निकाली काढू, अशी ग्वाही विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. सरकारला जागे करण्यासाठी २२ मे रोजी मंत्रालयासमोर ‘धनगरी ढोल गर्जना आंदोलन’ करणार असल्याची माहिती माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी रविवारी पत्रकार बैठकीत दिली.शेंडगे म्हणाले की, लोकसभा निवडणुकीवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी ...

सांगली : धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न पहिल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत निकाली काढू, अशी ग्वाही विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. सरकारला जागे करण्यासाठी २२ मे रोजी मंत्रालयासमोर ‘धनगरी ढोल गर्जना आंदोलन’ करणार असल्याची माहिती माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी रविवारी पत्रकार बैठकीत दिली.शेंडगे म्हणाले की, लोकसभा निवडणुकीवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगली व सोलापूर येथील प्रचार सभेत धनगर समाजाला आरक्षण देण्याची ग्वाही दिली होती. आता चार वर्षे झाले तरी मोदींचे धनगर समाजाला अच्छे दिन पाहायला मिळालेले नाही. विधानसभेवेळी पंढरपूर ते बारामती अशी पदयात्रा काढून उपोषण केले. तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनीही सत्तेत आल्यानंतर आरक्षण देण्याची घोषणा केली. धनगर समाजाच्या आरक्षणासाठी आम्हाला अभ्यासाची गरज नाही, आमचा अभ्यास पूर्ण झाल्याचेही ते म्हणाले होते. पण सत्तेत आल्यानंतर त्यांनी पुन्हा अभ्यासासाठी समिती नियुक्त केली.अभ्यास गटाच्या नावाखाली सरकार वेळकाढूपणा करीत आहे. या सरकारने धनगरांची फसवणूक केली आहे. त्यामुळे आंदोलनाशिवाय पर्याय राहिलेला नाही. भाजप सरकारने झोपेचे सोंग घेतले असून, त्याला जागे करण्यासाठी मंत्रालयासमोर २२ मे रोजी ‘धनगरी ढोल गर्जना आंदोलन’ करणार आहोत. या आंदोलनात ११ हजार ढोल वाजविणार असून, धनगर समाजाचे मठाधिपती, पुजारी सहभागी होणार आहेत. यातूनही सरकारला जाग न आल्यास २०१९ च्या निवडणुकीत भाजप सरकारला पायउतार केल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.ढोलवादनाचा विक्रमसध्या ढोलवादनाचा १३५६ जणांचा विश्वविक्रम आहे. या आंदोलनात सांगलीतून एक हजार, कोल्हापुरातून २ हजार ढोल सहभागी होणार आहेत. एकूण ११ हजार ढोल वादनाचे नियोजन केले असून, नवा विश्वविक्रमही करणार असल्याचे शेंडगे म्हणाले.