शहरं
Join us  
Trending Stories
1
मी विकृतीविरोधात लढतोय, भाजपा नाही; रवींद्र धंगेकरांचा पुन्हा हल्लाबोल, मोहोळांवर निशाणा
2
भारत ऑस्ट्रेलियाशी हरल्यावर 'कॅप्टन' गिलने घेतलं रोहितचं नाव; कुणावर फोडलं पराभवाचं खापर?
3
राज आणि उद्धव ठाकरेंसह संपूर्ण ठाकरे कुटुंब भाऊबीजेसाठी अनेक वर्षांनी आलं एकत्र, पाहा खास फोटो
4
उल्हासनगरात दिवाळीत पाणीटंचाईमुळे संताप; नागरिकांचा घरासमोर रिकामा हंडा ठेवून निषेध
5
Nagpur: नागपूर पदवीधरसाठी भाजपचा 'तो' चेहरा कोण? मुख्यमंत्र्यांनी दिले मोठे संकेत!
6
IND W vs NZ W, World Cup 2025 : टीम इंडियाची सुपरहिट जोडी! स्मृती-प्रतीकानं 'द्विशतकी' भागीदारीसह रचला इतिहास
7
Video: पेशावर शहरात ना पाकिस्तानी सैन्य ना सरकार; TTP चा कब्जा, असीम मुनीरच्या दाव्याची पोलखोल
8
Smriti Mandhana Century: स्मृतीची विक्रमी सेंच्युरी; वर्ल्ड रेकॉर्ड सेट करत झाली नवी 'सिक्सर क्वीन'
9
Jogeshwari Fire: १० व्या मजल्यावरुन 'ते' ओरडत होते, कपडे लपेटून घेतले; जोगेश्वरीतील अग्नितांडवाची थरारक दृश्य समोर...
10
ऑस्ट्रेलियाची 'दिवाळी'! भारतीय गोलंदाज 'फुसका बार'; कांगारुंनी फोडले 'मालिका विजया'चे फटाके
11
४० हजारांची नाणी घेऊन स्कूटी खरेदी करण्यासाठी पोहोचला शेतकरी, कर्मचाऱ्यांची तारांबळ, त्यानंतर...
12
Viral Video: पेट्रोलच्या पिशवीवर फटाका फोडला, तरुणासोबत घडलं भयंकर!
13
मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले तर...! महायुती की स्वबळावर, निवडणुकीबाबत मुरलीधर मोहोळ काय म्हणाले?
14
फायदेच फायदे! साखर नसलेला चहा आरोग्यासाठी गुणकारी, वजन कमी करण्यासाठी प्रभावी
15
ठरलं! 'या' तारखेला टीम इंडियाला मिळणार Asia Cup ट्रॉफी; पण नक्वी यांनी पुन्हा ठेवली खास अट
16
फ्री सेलिब्रेशन पार्टी अन् २ लाख रोख, फक्त 'ती' गर्भवती राहिली पाहिजे; हॉटेल मालकानं दिली ऑफर
17
Pratika Rawal Equals World Record : अंपायरच्या लेकीची कमाल! सर्वात जलद १००० धावांसह विश्वविक्रमाची बरोबरी
18
स्टाइल मारणं महागात पडलं...! रीलसाठी तोंडात फोडले ६ फटाके, ७ वा सुतळी बॉम्ब फुटला अन् १८ वर्षांच्या तरुणाचा अख्खा जबडाच उडाला!
19
Infosys, HCL Tech सह अनेक शेअर्समध्ये जोरदार रॅली; 'या' ५ कारणांमुळे आयटी स्टॉक्स चमकले
20
VIRAL VIDEO : 'आग' लावून हँडशेक! काय आहे 'Fire Handshake' ट्रेंड? डॉक्टरांनी दिली गंभीर चेतावणी!

आरक्षणाबाबत सरकारकडून राज्यात फसवणुकीचाच खेळ: धनंजय मुंडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2018 22:53 IST

कवठेमहांकाळ : मराठा समाजाला दिलेले आरक्षण न्यायालयात कितपत टिकेल, याबद्दल शंका आहे. धनगर समाजाला अद्याप आरक्षण दिले नाही. त्यामुळे ...

कवठेमहांकाळ : मराठा समाजाला दिलेले आरक्षण न्यायालयात कितपत टिकेल, याबद्दल शंका आहे. धनगर समाजाला अद्याप आरक्षण दिले नाही. त्यामुळे आरक्षणाच्या नावाखाली सरकार या समाजबांधवांना फसवित आहे, अशी टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी नागज येथे केली.नागज (ता. कवठेमहांकाळ) येथे रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. आ. सुमनताई पाटील, माजी आमदार दीपक साळुंखे, माजी आमदार प्रकाश शेंडगे उपस्थित होते.मुंडे म्हणाले, या सरकारने देशातील जनतेला ‘अच्छे दिन’ची खोटी स्वप्ने दाखवली. काळे धन देशात आणले नाही, की १५ लाख रुपये प्रत्येक नागरिकाच्या खात्यावर जमा झाले नाहीत. त्यामुळे हेच का ‘अच्छे दिन’ असे म्हणण्याची वेळ आली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी धनगर समाजाला पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत एसटीचे आरक्षण देतो असे सांगितले होते; पण अशा अनेक बैठका होऊनही आरक्षण का दिले नाही, याचे उत्तर त्यांनी द्यावे.ते म्हणाले, भाजप हा संघाच्या विचारावर चालणारा जातीवादी पक्ष आहे. त्यामुळे धनगर समाजाला हे सरकार आरक्षण देणार नाही. मराठा समाजाला दिलेले आरक्षण न्यायालयात किती टिकेल, याबद्दल शंका आहे. जर आरक्षण टिकले नाही, तर भाजप मराठा समाजाला फसवतोय, हे स्पष्ट होईल.आ. सुमनताई पाटील म्हणाल्या, दोन महिने झाले तरी प्रशासन टँकर देत नाही, तलाव भरून देत नाही. प्रशासन आमच्या मागणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करते. याला भाजप सरकार जबाबदार आहे. आज आबा असते तर ही परिस्थिती आली असती का?प्रकाश शेंडगे म्हणाले, मराठा व ओबीसी यांच्यात भांडणे लावण्याचा भाजप सरकारचा डाव आहे.भ्रष्ट मंत्र्यांना क्लीन चिटराज्य सरकारमधील १६ मंत्र्यांनी घोटाळे केले आहेत, त्याचे पुरावेही मी दिले. परंतु त्यांना मुख्यमंत्री फडणवीस यांनी क्लीन चिट दिली. हे या सरकारचे महापाप आहे, असे धनंजय मुंडे म्हणाले.खासदारांना घरी बसवामुंडे म्हणाले, तासगाव-कवठेमहांकाळमध्ये आता आर. आर. आबा नसल्याने जनतेच्या स्वप्नांचा चुराडा झाला. आबांचे स्वप्न साकार करण्यासाठी तुम्ही सुमनताई पाटील यांना ताकद द्या. या जिल्ह्यात पाण्याचे राजकारण केले जातेय. येथील खासदार पाण्याचे राजकारण करीत आहेत, ही खेदाची बाब आहे. त्यांना आता घरी बसविण्याची वेळ आली आहे.