शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

देवेंद्र फडणवीसांना राज्यात फिरून देणार नसल्याचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:17 IST

सांगली : देवेंद्र फडणवीस, भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कारस्थानांमुळेच मराठा आरक्षणाचा कायदा सर्वोच्च न्यायालयात टिकला नाही. त्यामुळे फडणवीसांना ...

सांगली : देवेंद्र फडणवीस, भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कारस्थानांमुळेच मराठा आरक्षणाचा कायदा सर्वोच्च न्यायालयात टिकला नाही. त्यामुळे फडणवीसांना राज्यात फिरून देणार नाही, असा इशारा मराठा स्वराज्य संघाने दिला आहे. मराठ्यांना आरक्षण ही जबाबदारी राज्याची नसून केंद्राची असल्याचा दावा संघाने केला.

अध्यक्ष महादेव साळुंखे, प्रवक्ते पंडितराव बोराडे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी पत्रकार बैठकीत मराठा आरक्षणातील अडथळे विशद केले. ते म्हणाले, राज्यातील ९७ टक्के मराठा अत्यंत विपन्नावस्थेत दिवस कंठत आहे. त्यांना आरक्षण मिळू नये, यासाठी भाजप, स्वयंसेवक संघ व फडणवीसांनी माणसे पेरली. मराठा आरक्षणाविरोधात याचिका दाखल करणारे सर्व याचिकाकर्ते त्यांचेच हस्तक आहेत. त्यामुळे फडणवीस म्हणजे महाराष्ट्राला लागलेला कलंक आहेत, तो धुऊन काढण्याचे काम बहुजनांनी करायला हवे. आरक्षणाची प्रक्रिया सुरळीत सुरू असताना, त्यांनी गोंधळ निर्माण केला. त्यांचा खरा चेहरा समोर आणण्याचे काम आम्ही करणार आहोत.

ते म्हणाले, ओबीसी आरक्षणाविरोधात फडणवीस सरकारने २०१७ मध्ये अध्यादेश काढला, त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था व राजकारणातून ओबीसी हद्दपार होण्याची वेळ आली आहे. त्याचे खापर महाविकास आघाडीवर फोडण्याचा प्रयत्न सुरू आहे. राजकारणापोटी संपूर्ण महाराष्ट्राचे नुकसान केले जात आहे, हे खपवून घेणार नाही. फडणवीस राज्यात कोठेही गेले, तरी त्यांच्या गाड्या अडवू. फिरून देणार नाही.

यावेळी संघाचे जिल्हाध्यक्ष सुभाष गायकवाड, अविनाश शिंदे, मनपा क्षेत्र अध्यक्ष सुधीर चव्हाण, कवठेमहांकाळचे अमोल जाधव, शरद पवार, गोपाळ पाटील, सतीश पाटील, पंडित पाटील, शंकर शिंदे आदी उपस्थित होते.

चौकट

भाजपमधील मराठ्यांनी विचार करायला हवा

साळुंखे म्हणाले, भाजपमधील मराठा नेत्यांनी समाजाशी निष्ठा दाखवून दिली पाहिजे. भाजपमध्ये राहून आपल्याच समाजबांधवांच्या आरक्षणाला विरोध करणे त्यांना शोभणारे नाही. पक्षाची तळी उचलताना आपण समाजाचे नुकसान करत आहोत, हे लक्षात ठेवले पाहिजे.