शहरं
Join us  
Trending Stories
1
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
2
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
3
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
4
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
5
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
6
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
7
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
8
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
9
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
10
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
11
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
12
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
13
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
14
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
15
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
16
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."
17
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
18
धक्कादायक घटना! एक वर्षाच्या मुलाने नागाचा चावा घेतला, कोब्राचा मृत्यू झाला; पण मुलगाही...
19
पाकिस्तानने अमेरिकेसमोर TRF'वर सूर बदलला! म्हणाले, आम्हाला काही हरकत नाही', हुशारीही दाखवली
20
₹३० वरुन ₹३००० पार गेला हा शेअर; आता कंपनीनं मोठ्या गुंतवणुकीची केली घोषणा, तुमच्याकडे आहे का?

विकासकामे, व्यसनमुक्तीमुळे गावांची प्रगती

By admin | Updated: June 22, 2015 00:13 IST

शरद पवार : इनामधामणी ग्रामपंचायतीच्या विविध विकासकामांचे उद्घाटन

मिरज : आरोग्य, शिक्षण, स्वच्छतेसोबतच व्यसनमुक्तीमुळे गावांचा विकास शक्य आहे. विकास कामांसाठी निधी कसा मिळवावा, याचे इनामधामणी हे चांगले उदाहरण असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष खा. शरद पवार यांनी सांगितले. इनाम धामणी (ता. मिरज) ग्रामपंचायतीच्या २४ कोटी रूपये खर्चाच्या विविध विकासकामांचे व ग्रामपंचायतीच्या नवीन इमारतीचे उद्घाटन खा. शरद पवार यांनी केले. अध्यक्षस्थानी माजी मंत्री प्रकाश आवाडे होते. धामणी ग्रामपंचायतीने केलेल्या विकासकामांचे कौतुक करून, ही कामे चांगली कशी राहतील, गावात स्वच्छता, आरोग्य, शिक्षण यासोबतच व्यसनमुक्तीची काळजी घेऊन आदर्श गाव बनविण्यासाठी प्रयत्न करा, असा संदेश खा. पवार यांनी दिली. खा. पवार म्हणाले, धामणी ग्रामपंचायतीने थोर कर्तृत्ववान व्यक्तींच्या नावे स्वागत कमानी उभारून इतिहासाचे स्मरण केले आहे. वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील निधी मिळविण्यात पटाईत आहेत. गावाच्या विकासासाठी बाहेरून निधी उपलब्ध करून त्यांनी चांगला आदर्श कार्यक्रम राबविला आहे. सरपंच मालुश्री पाटील यांनी, गेल्या पाच वर्षात ग्रामपंचायतीने केलेल्या विकासकामांची माहिती दिली. विठ्ठल पाटील यांच्या नेतृत्वाखाली गावात अंतर्गत व प्रमुख रस्ते, पाणी पुरवठा योजना, प्रत्येक समाजाचे समाजमंदिर, ज्येष्ठ नागरिकांना सुविधा आदी २४ कोटी रूपयांची विकासकामे करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.ग्रामीण भागात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना शरद पवार यांचे नेतृत्व प्रेरणादायी असल्याचे विठ्ठल पाटील यांनी सांगितले. धामणी ग्रामपंचायतीच्या नवीन इमारतीचे व अण्णासाहेब मगदूम सभागृहाचे उद्घाटन खा. शरद पवार यांच्याहस्ते झाले. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे मार्ग बस थांबा, छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतिवीर उमाजी नाईक, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे, महात्मा बसवेश्वर महाराज, संत रोहिदास या प्रवेशद्वारांचे उद्घाटन करण्यात आले. गावातील कचरा गोळा करणाऱ्या अत्याधुनिक घंटागाडीचे उद्घाटन जि. प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश लोखंडे यांनी केले.याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्माक्का होर्तीकर, माजी आमदार विलासराव शिंदे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश लोखंडे, वसंतदादा कारखान्याचे उपाध्यक्ष आप्पासाहेब मगदूम, सुरेश पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीपतात्या पाटील, अशोक स्वामी, गटविकास अधिकारी उत्तमराव वाघमोडे, जिल्हा क्रीडाधिकारी युवराज नाईक, उपसरपंच आप्पासाहेब सवदे अंकलीचे सरपंच किरण कुंभार उपस्थित होते. जितेंद्र कोलप यांनी सूत्रसंचालन केले. (वार्ताहर)निधी खेचण्यात पटाईतखासदार पवार यांनी इनामधामणी ग्रामपंचायतीने गावात केलेल्या विकास कामांबाबत प्रशंसा केली. ते म्हणाले की, आदर्श गाव बनविण्यासाठी ग्रामपंचायतीने आरोग्य, शिक्षण, स्वच्छता या क्षेत्रांत विशेष काम करावयास हवे. सुदैवाने इनामधामणी गावास वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांच्यासारखे चांगले नेतृत्व लाभले आहे. ते निधी खेचून आणण्यात पटाईत आहेत. त्यामुळेच शासनाकडून कोट्यवधींचा निधी गावास मिळून मोठ्या प्रमाणावर विकासकामे करण्यात येत आहेत. हे गावच्या विकासाचे, प्रगतीचे चांगले लक्षण आहे.