शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

शोषण शक्तींविरोधी संघर्षाचा निर्धार

By admin | Updated: September 23, 2016 23:38 IST

परिवर्तनवादी कार्यकर्ते उपस्थित : इस्लामपूर येथे लोकशाही संघर्ष यात्रेचे स्वागत

इस्लामपूर : भारतीय संविधानाला आव्हान देत लोकशाही मूल्ये पायदळी तुडवून शोषण करणाऱ्या प्रतिगामी शक्तींविरुध्दचा लढा पूर्ण त्वेषाने लढायला हवा, समाजवाद आणि धर्मनिरपेक्षतेच्या संकल्पनेतून नवसमाज निर्मितीसाठी संघर्ष करण्याचा निर्धार राजकुमार तांगडे यांनी व्यक्त केला. लोकशाही रक्षण आणि संघर्ष यात्रेच्या पुण्याहून निघालेल्या जथ्याचे शुक्रवारी सकाळी इस्लामपुरात आगमन झाले. पंचायत समिती आवारातील क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्याजवळ परिवर्तनवादी चळवळीतील प्रा. बी. आर. जाधव, प्रा. एल. डी. पाटील, बी. जी. पाटील, दीपक कोठावळे यांनी या जथ्याचे स्वागत केले. त्यानंतर शहरातून मिरवणूक काढण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ समारोप करण्यात आला. तांगडे म्हणाले, क्रांतिसिंह नाना पाटील यांनी प्रति सरकार स्थापन करुन ज्या भूमीत क्रांतीची बीजे रोवली, तेथून क्रांतीची पे्ररणा घेऊन ही संघर्ष यात्रा पुढे जाणार आहे. प्राचार्य विश्वास सायनाकर म्हणाले, संविधान वाचविण्यासाठी प्रतिगाम्यांचा खरा चेहरा लोकांसमोर आणावा लागेल. लोकशाही वाचविण्यासाठीच्या संघर्ष यात्रेत प्रत्येकाने सहभागी व्हावे. संजय बनसोडे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. प्रा. एल. डी. पाटील यांनी आभार मानले. यावेळी डॉ. बाबूराव गुरव, कॉ. धनाजी गुरव, नामदेव परमणे, नीरज जैन, प्रकाश कांबळे यांच्यासह परिवर्तनवादी कार्यकर्ते उपस्थित होते. (वार्ताहर)