शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
2
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
3
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
4
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
5
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
6
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
7
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
8
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
9
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
10
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
11
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
12
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
13
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
14
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
15
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान
16
क्रूरतेचा कळस! गुजरातमधून विमानानं आला, गर्लफ्रेंडवर अत्याचार केला अन् ५१ वेळा स्क्रूड्रायव्हर खुपसला; कोर्टाने सुनावली शिक्षा
17
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
18
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
19
UPSC ची तयारी करणाऱ्या युवकानं उचललं धक्कादायक पाऊल; स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला, कारण...
20
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता

जिल्हा बॅँकेतील विजयाने देशमुख गट रिचार्ज

By admin | Updated: May 12, 2015 23:43 IST

आटपाडीत समर्थकांचा जल्लोष : देशमुखवाडा गुलालात न्हाला, कार्यकर्त्यांत उत्साह

अविनाश बाड-आटपाडी -विधानसभा निवडणुकीनंतर सुना-सुना दिसणारा आटपाडीतील देशमुखांचा वाडा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या निवडणुकीत उदयसिंह ऊर्फ संजूकाका देशमुख यांच्या विजयामुळे गुलालाने न्हाऊन निघाला संजूकाकांच्या निवडीमुळे देशमुख गटाचे कार्यकर्ते रिचार्ज झाले  आहेत. आतापर्यत अनेक निवडणुकांमध्ये माजी आमदार राजेंद्रआण्णा देशमुख आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांनी उमेदवारी केली आहे. पण त्यांच्या निवडणुकीची सारी सूत्रे पडद्यामागून उदयसिंह ऊर्फ संजूकाका हाताळत होते.राजेंद्रअण्णांनी लढविलेली विधानसभेची निवडणूक असो अथवा अमरसिंह देशमुख यांनी तालुक्याला प्रथमच मिळवून दिलेल्या जिल्हा परिषदेच्या लाल दिव्याची गाडी असो या सर्व निवडणुका ज्यांनी पडद्याच्या पाठीमागून हाताळल्या, त्या संजूकाकांना जिल्हा बॅँकेच्या निमित्ताने प्रथमच थेट संधी मिळाली.विशेष म्हणजे आटपाडी तालुक्यात एकूण ६८ विकास सोसायट्या आहेत. त्यापैकी ४५ संस्था देशमुख गटाच्या ताब्यात आहेत. पण उदयसिंह देशमुख यांना ५१ मते मिळाली म्हणजेच देशमुख गटाच्या राजकीय विरोधकांचीही सहा मते मिळाली. तालुक्यात कॉँग्रेसचे उमेदवार वसंतराव गायकवाड यांनी फक्त १६ मते मिळाली. मग देशमुखांना मिळालेली मते भाजपची की शिवसेनेची, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.पण नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांना अमरसिंह देशमुख यांच्या उमेदवारीने विरोध केल्याने शिवसेनेची मते एकाच शेतकरी सहकारी पॅनेलमध्ये असूनही मिळाली की नाही, याबद्दल तर्कवितर्क लढविले जात आहेत.दरम्यान, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालकपदाच्या निवडणुकीत मिळविलेल्या या दमदार विजयामुळे देशमुख गटाच्या कार्यकर्त्यामध्ये आता उत्साह संचारल्याचे चित्र आहे. असे असले तरी आता माणगंगा सहकारी साखर कारखाना, बाबासाहेब देशमुख सूतगिरणी आणि कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक लवकरच होणार आहे. या निवडणुकीमध्ये शिवसेना आणि भाजपसह देशमुख गटाचे सगळे विरोेधक या निवडणुकांमध्ये वेगळी भूमिका घेणार असून, त्याला देशमुख गटाचे हे ‘त्रिदेव’ कशी टक्कर देणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.देशमुखांचा ‘कार्यक्रम’ कधी थांबणार ?वारा ज्या दिशेने वाहतो, त्या दिशेने वाहत जाणे सुकर असते, पण देशमुख गटाला हे आजपर्यंत जमलेले नाही. अनेक नेत्यांना, अनेक गटांना देशमुख गटाने अनेक निवडणुकीत मदत केली, पण राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याशी एकनिष्ठ राहणाऱ्या या गटाचा लाभ घेणाऱ्या सर्वांनीच अनेकवेळा ‘कार्यक्रम’ केला आहे. तालुक्यातील, मतदारसंघातील आणि अगदी जिल्ह्यातील नेत्यांनीही या गटाचा वारंवार कार्यक्रम केला आहे. मात्र देशमुख गटाने आतापर्यंत तरी आपली राजकीय चाल सोडलेली नाही. हे चांगले का वाईट, हे येणारा काळच ठरवेल.