शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
4
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
5
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
6
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
7
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
8
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
9
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
10
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
11
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
12
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
13
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
14
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
15
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
16
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
17
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल
18
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
19
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
20
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांना झिडकारा : देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2018 23:15 IST

सांगली : वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खंजीर खुपसणाºयांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस महापालिकेची निवडणूक लढवित आहे. हा त्यांचा अपमान असून, त्यांच्या पाठीत खंजीर खुपसणाºयांना या निवडणुकीत धडा शिकवा, असे प्रतिपादन पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी रविवारी सांगलीत केले.महापालिका निवडणुकीत भाजप उमेदवारांच्या प्रचाराचा प्रारंभ येथील गणपती मंदिरासमोर झाला. यावेळी आयोजित सभेत पालकमंत्री देशमुख बोलत ...

सांगली : वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खंजीर खुपसणाºयांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस महापालिकेची निवडणूक लढवित आहे. हा त्यांचा अपमान असून, त्यांच्या पाठीत खंजीर खुपसणाºयांना या निवडणुकीत धडा शिकवा, असे प्रतिपादन पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी रविवारी सांगलीत केले.महापालिका निवडणुकीत भाजप उमेदवारांच्या प्रचाराचा प्रारंभ येथील गणपती मंदिरासमोर झाला. यावेळी आयोजित सभेत पालकमंत्री देशमुख बोलत होते. खा. संजयकाका पाटील, खा. अमर साबळे, आमदार सुधीर गाडगीळ, आ. सुरेश खाडे, प्रदेश सरचिटणीस आ. सुरेश हळवणकर, जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, माजी आमदार दिनकर पाटील, मकरंद देशपांडे, शेखर इनामदार उपस्थित होते.देशमुख म्हणाले की, सांगली जिल्ह्याला वसंतदादांचा वारसा आहे. दादांच्या जन्मशताब्दी वर्षात त्यांच्या नावाच्या संस्था नेस्तनाबूत झाल्या. त्यांना किती वेदना झाल्या असतील. या संस्था बुडविणाºयांना सांगलीच्या जनतेने धडा शिकविण्याची वेळ आली आहे. ज्यांनी वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसला, त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस महापालिकेची निवडणूक लढवित आहे. सत्ता बळकाविण्यासाठी एकत्र आलेल्यांना जनता घरात बसविल्याशिवाय राहणार नाही.देश व राज्य जनतेने काँग्रेसमुक्त केले आहे. सांगली जिल्हा परिषदेतही सत्तापरिवर्तन केले. आता काँग्रेसची ही शेवटची सत्ता आहे. जनतेने महापालिकासुद्धा काँग्रेसमुक्त करावी, असे आवाहन करीत देशमुख म्हणाले की, देशात, राज्यात परिवर्तन झाल्यानंतर भाजपने जनतेच्या हितासाठी अनेक योजना हाती घेतल्या. मुद्रा योजना, मोफत गॅस कनेक्शन अशा योजनांतून जनतेपर्यंत सुविधा पोहोचविल्या. मराठा समजातील तरुणांना आरक्षणांतर्गत नोकरीचा मुद्दा न्यायालयात प्रभावीपणे मांडला जात आहे. या तरुणांना उद्योग, व्यवसाय सुरू करण्यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला मोठा निधी दिला आहे, असेही त्यांनी सांगितले.सुरेश हळवणकर म्हणाले की, महापालिकेत काँग्रेसची २० वर्षे सत्ता आहे. पण नागरिकांना पाणी, रस्ते, गटारी आदी सुविधाही दिलेल्या नाहीत. दोन कचरा डेपोमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शेरीनाल्याने कृष्णा नदी प्रदूषित होत आहे. हा प्रश्नही सत्ताधाºयांना सोडविता आलेला नाही. भाजप सत्तेवर आल्यानंतर शेरीनाल्यासाठी १३ कोटींचा निधी आणून नदीचे प्रदूषण थांबविले जाईल. सांगलीचा विकास केवळ भाजपच करू शकतो. जनतेच्या कल्याणासाठी गणरायाच्या साक्षीने जो जाहीरनामा तयार होईल, त्याची अंमलबजावणी भाजप करेल, अशी ग्वाही त्यांनी दिली.खासदार संजयकाका म्हणाले, अनेक वर्षे भ्रष्टाचाराने बरबटलेल्या काँग्रेसच्या कारभाराने जनता त्रासली आहे. काँग्रेस कारभारामुळे या शहराचा विकास थांबला. मिरजेच्या पाणी योजनेचा समावेश अमृत योजनेत केला असतानाही न्यायालयात जाऊन याला खीळ घालण्याचा प्रयत्न केला गेल्याचा आरोप केला.भाजप नेत्यांकडून : जयंत पाटील टार्गेटभाजपच्या प्रचार प्रारंभावेळी पालकमंत्री सुभाष देशमुख, आ. सुरेश हळवणकर यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना लक्ष्य केले. हळवणकर यांनी, वसंतदादांचे नाव नातू घेत नाही, मात्र जयंत पाटील यांनी या निवडणुकीत वसंतदादांचे नाव घ्यावे लागल्याचा टोला लगाविला. तर सुभाष देशमुख यांनी ‘खंजिर’चा विषय चर्चेत आणत भाजपच्या प्रचाराची दिशाच स्पष्ट केली.भर पावसात शपथभाजपने सर्व उमेदवार डोक्याला फेटा, खांद्यावर भाजपचा पट्टा अशा वेशभूषेत उभे होते. भर पावसात प्रचाराचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी आमदार सुधीर गाडगीळ यांनी सर्व उमेदवारांना पारदर्शी, गतिमान, विकासाभिमुख, भ्रष्टाचारमुक्त कारभाराची शपथ दिली.