शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

सांगली बाजार समितीतील भ्रष्टाचाराची उपनिबंधकांकडून चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:26 IST

कुपवाड : सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीत झालेल्या भ्रष्टाचाराच्या चाैकशीबाबत पणन संचालक सतीश सोनी यांनी जिल्हा उपनिबंधकांची चाैकशी अधिकारी ...

कुपवाड : सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीत झालेल्या भ्रष्टाचाराच्या चाैकशीबाबत पणन संचालक सतीश सोनी यांनी जिल्हा उपनिबंधकांची चाैकशी अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. पणन संचालकांना बाजार समितीतील झालेल्या जमीन खरेदी, नोकर भरती, गाळे वाटप व जागा विक्रीसंदर्भात चौकशी करून कारवाईचे आदेश दिले आहेत.

बाजार समितीच्या गैरव्यवहारप्रकरणी कानडवाडी (ता. मिरज) येथील सरपंच अनिल शेगुणशे यांनी पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे तक्रार केली होती. तक्रारीत म्हटले आहे की, फळे व भाजीपाला मार्केटमधील लिपिकांच्या मालमत्तेची चौकशी करावी, माजी सचिव हुल्याळकर निवृत्त झाले आहेत, तरीही कंत्राटी पध्दतीने त्यांची नेमणूक करून दरमहा पगार दिला जातो. ते बेकायदेशीर आहे, त्यांची वसुली व्हावी, अनुकंपा तत्त्वावर जी नोकरभरती चालू आहे, त्याचीही कार्यवाही पणन संचालकांच्या कार्यालयात प्रलंबित आहे. यासह कृषी उत्पन्न बाजार समितीतील विविध प्रकरणांबाबत शासनाकडे तक्रारी केल्या आहेत.

पणनमंत्री पाटील यांनी पणन संचालकांना बाजार समितीतील भ्रष्टाचाराची चौकशी करून कार्यवाही करावी, असे आदेश दिले आहेत. त्यानुसार पणन संचालकांनी जिल्हा उपनिबंधकांना संबंधित तक्रारीबाबत चौकशी करून योग्य ती कार्यवाही करावी व वरिष्ठांकडे अहवाल सादर करावा, असे आदेश दिले आहेत.

चाैकट

काेट्यवधीचा भ्रष्टाचार

शेगुणशे म्हणाले, बाजार समितीने सावळी (ता. मिरज) येथील गट नं. २०१ ते २०५ ही जमीन खरेदी केली आहे. या व्यवहारात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे. याबाबतची तक्रार पणनमंत्री पाटील यांच्यासह पालकमंत्री जयंत पाटील, खासदार संजय पाटील यांच्याकडे केली होती. त्याचबरोबर उमदी (ता. जत) येथील जमीन व्यवहारामध्ये भ्रष्टाचार झाला आहे. विष्णुअण्णा फळे व भाजीपाला मार्केटमधील खुल्या जागेमध्ये गाळे बांधून व विक्री करून भ्रष्टाचार केला आहे. याचीही चौकशी जिल्हा उपनिबंधकांकडून होणार आहे.