शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

मोबाईल ॲपव्दारे कर्ज घेऊन वाढतोय मन:स्ताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:21 IST

सांगली : मोबाईल ॲपच्या माध्यमातून झटपट कर्ज देणाऱ्यांकडून सावध राहण्याच्या सूचना शासनातर्फे देण्यात आल्या असल्या तरी या माध्यमातून कर्ज ...

सांगली : मोबाईल ॲपच्या माध्यमातून झटपट कर्ज देणाऱ्यांकडून सावध राहण्याच्या सूचना शासनातर्फे देण्यात आल्या असल्या तरी या माध्यमातून कर्ज घेतलेल्यांना मन:स्ताप सहन करावा लागत आहे. आतापर्यंत केवळ उदाहरणे ऐकली असली तरी आता सांगलीतही असा प्रकार उघडकीस आला आहे. त्यांनी पोलिसात संपर्क साधून तक्रारही दाखल केली आहे.

लॉकडाऊन कालावधित सर्वजण घरातच अडकून पडल्याने अनेकांना आर्थिक चणचण भासू लागली होती. उत्पन्नाची साधनेही नसल्याने अडचणी वाढल्या होत्या. नेमकी हीच संधी साधून केवळ मोबाईल ॲपवर माहिती भरल्यास पाच हजार रुपयांपासून ५० हजार रुपयांपर्यंतची कर्जे देण्यात येत आहेत. या कंपन्यांचे ॲप मोबाईलमध्ये घेतल्यानंतर त्या व्यक्तीचे संपर्क क्रमांकासह सर्व माहिती त्या कंपनीकडे जाते. तात्काळ सेवा देताना कर्जाची रक्कम पाठविलीही जाते; मात्र त्यानंतर खरा मन:स्ताप सहन करावा लागत आहे. पैसे परत करण्यास उशीर झाल्यास थेट कर्जदाराच्या नावाने व्हॉटस‌्-ॲप बदनामीकारक संदेश त्याच्या संपर्क यादीतील लोकांना पाठविले जात आहेत. तरीही पैसे न दिल्यास त्या व्यक्तीच्या माहितीचा, फोटोसह इतर माहितीचाही गैरवापर करून वारंवार त्यास मन:स्ताप दिला जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. काही दिवसांपूर्वीपर्यंत हा प्रकार इतर ठिकाणी चर्चेत होता. आता सांगलीतही कर्जदारास त्रास दिला जात असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. यातील काहींनी पोलिसांशी संपर्क साधून आपली तक्रार दाखल केली आहे.

चाैकट

इन्स्टंट कर्ज देणाऱ्या या कंपन्यांचे ॲप मोबाईलमध्ये इन्स्टॉल करताच त्या मोबाईलधारकांची सर्व माहिती लीक होते. त्यामुळे पुढे एखादाजरी हप्ता भरण्यास उशीर झाला तर थेट त्याच्या संपर्क यादीतील लोकांना मेसेज करून आणि काॅल करूनही त्रास दिला जातो. त्यामुळे अशी ॲप मोबाईलमध्ये घेऊ नयेत, असे आवाहन पाेलिसांनी केले आहे.