शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

यशवंतराव मोहिते पतसंस्थेच्या ठेवी परत मिळेनात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:25 IST

अशोक पाटील लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : रेठरे बुद्रुक (ता. कऱ्हाड) येथे मुख्य शाखा असलेल्या यशवंतराव मोहिते पतसंस्थेचे ठेवीदार ...

अशोक पाटील

लोकमत न्यूज नेटवर्क

इस्लामपूर : रेठरे बुद्रुक (ता. कऱ्हाड) येथे मुख्य शाखा असलेल्या यशवंतराव मोहिते पतसंस्थेचे ठेवीदार अडचणीत आले आहेत. कासेगाव (ता. वाळवा) येथील शाखेचे ठेवीदार दीड वर्षापासून हेलपाटे घालत आहेत, मात्र ठेवीची रक्कम परत मिळण्याऐवजी उडवाउडवीची उत्तरे मिळत आहेत. त्यामुळे ते आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.

कासेगाव येथील संतोष बाळकृष्ण पाटील (११ लाख २० हजार), बाबूराव भाऊ माने (२ लाख ५० हजार), अक्षय बाबूराव माने (१ लाख ४८ हजार), इलाई दादासाहेब आत्तार (२ लाख २५ हजार), ताराचंद रामलाल प्रजापती (२ लाख) यांनी मुदत ठेव, अल्पबचत (पिग्मी) या माध्यमातून सुमारे २० लाख रुपये पतसंस्थेत गुंतवले आहेत. त्यांनी गेल्या दीड वर्षापासून रेठरे बुुद्रुकच्या मुख्य शाखेसह मलकापूर, कासेगाव शाखेत जाऊन ठेवी मागण्याचा प्रयत्न केला. परंतु तेथे शिपायाशिवाय कोणीही कर्मचारी जागेवर नसतात. त्यामुळे सर्वांनी संस्थापक डॉ. इंद्रजित मोहिते यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांनी निवेदन स्वीकारले नाही. हे निवेदन मलकापूर शाखेतील शिपाई या पदावरील कर्मचाऱ्याने स्वीकारले. हे ठेवीदार पैसे बुडतील या भीतीपोटी सैरभैर झाले आहेत.

काही महिन्यांपूर्वी या खातेदारांनी डॉ. इंद्रजित मोहिते यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी, ‘तुमच्या रकमेला मी जबाबदार आहे. माझ्या वडिलांच्या नावाने ही संस्था स्थापन केली आहे. त्यामुळे वडिलांच्या नावाला कोणतेही गालबोट लागणारे कृत्य करणार नाही’, अशी ग्वाही ठेवीदारांना दिली होती. पैशाची जबाबदारी घेतली आहे. परंतु आजअखेर पैसे परत मिळाले नसल्याने गुंतवणूकदार आक्रमक झाले आहेत.

चौकट

सचिवानेही दाद घेतली नाही

ठेवी परत मिळण्यासाठी संबंधित ठेवीदारांनी संस्थेचे सचिव गणेश गरुड यांची वारंवार भेट घेतली; परंतु त्यांना गरुड यांनी कसलीही दाद दिली नाही. आता या संस्थेतील कारभार एखादा कर्मचारी किंवा शिपाई पाहत आहेत.

कोट

माझ्या वडिलांच्या नावे असलेली ही संस्था आहे. यामध्ये काही आर्थिक व्यवहार झाले आहेत. त्याच्या ताळेबंदाची माहिती घेणार आहे. वडिलांच्या नावाने संस्था असल्याने त्याची पूर्ण जबाबदारी मी घेत आहे. ताळेबंदाचा अहवाल आल्यानंतरच यावर बोलू.

- डॉ. इंद्रजित मोहिते, संस्थापक, यशवंतराव मोहिते पतसंस्था