शहरं
Join us  
Trending Stories
1
Thane: कल्याणमध्ये चार मजली इमारतीत स्लॅब कोसळून भयंकर दुर्घटना, चार जणांचा मृत्यू 
2
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 
3
'ढोंगी आणि बकवास लेकाचे'; छगन भुजबळ मंत्री होताच संजय राऊतांनी कोणावर डागली तोफ?
4
दिग्वेश राठीनं शायनिंग मारण्याच्या नादात IPL पगारातील किती रक्कम उडवली माहितीये?
5
केंद्र सरकारच्या शिष्टमंडळात सामील होण्यास उद्धव ठाकरेंचा होकार, खा. प्रियंका चतुर्वेदींची निवड
6
IPL 2025: SRHचा हर्षल पटेल ठरला मलिंगा-बुमराहपेक्षाही 'वेगवान'; केला ऐतिहासिक पराक्रम
7
'आम्हाला चिनी क्षेपणास्त्र PL-15E चे अवशेष हवेत'; जपान अन् फ्रान्ससह अनेक देशांची मागणी
8
धक्कादायक! तुमच्या जवळच्या 'या' ७ गोष्टी टॉयलेट सीटपेक्षाही घाणेरड्या; लपलेत लाखो बॅक्टेरिया
9
बाजारात 'रेड अलर्ट'! सेन्सेक्स-निफ्टी सलग तिसऱ्या दिवशी खाली, ऑटो-डिफेन्स कोसळले, DLF मात्र तेजीत
10
Tamil Nadu Landslide: मोठी दुर्घटना! तामिळनाडूत दगड खाणीत भूस्खलन झाल्याने ४ कामगार ठार, एक जखमी
11
'आता सगळ्याचे दाखले पुराणात शोधण्याच्या काळात अशी माणसं...'; राज ठाकरेंची जयंत नारळीकरांबद्दल पोस्ट
12
२०२५ मध्ये शनैश्चर जयंती कधी आहे? ‘या’ गोष्टी आवर्जून करा; पाहा, महत्त्व, महात्म्य, मान्यता
13
अखेर परेश रावल यांनी सांगितलं 'हेरा फेरी ३' सोडण्यामागचं कारण; म्हणाले, "मला ही भूमिका..."
14
Jyoti Malhotra : 'लव्ह यू खुशमुश'...! ज्योतीला पोलीस घरी घेऊन गेले, ती रुममधून बाहेर पडताच पोलिसांना पत्र मिळाले
15
‘या’ ३ गोष्टी नेहमी लक्षात ठेवा, अखंडित सेवा करा; स्वामी शुभफल देतील, अढळ विश्वास असू द्या!
16
मदरशांत ऑपरेशन सिंदूरचे धडे शिकविले जाणार; उत्तराखंड सरकारचा निर्णय
17
प्लास्टिक, काच की स्टील... फ्रिजमध्ये कोणती पाण्याची बाटली ठेवणं आरोग्यासाठी फायदेशीर?
18
"खरंतर शरीफ यांच्या घरी बिर्याणी खायला गेलेल्यांना निशान ए पाकिस्तान मिळाला पाहिजे’’, काँग्रेसचा टोला   
19
पक्के घर बांधण्याचं स्वप्न पूर्ण होणार! PM आवास योजनेची मुदत वाढवली, कशी आहे प्रक्रिया?
20
१८ महिन्यांनी राहु-केतु गोचर: शनीशी अशुभ युती संपणार; ८ राशींना बंपर लाभ होणार, शुभच घडणार!

देवरुख नगर पंचायतीला सत्ताधाऱ्यांचेच टाळे

By admin | Updated: June 25, 2015 23:01 IST

विविध प्रश्नांवर आक्रमक : प्रशासनाविरूध्द व्यक्त केला संताप

देवरूख : नगरपंचायत प्रशासनाच्या गलथान काराभाराविरोधात आक्रमक होत सत्ताधारी शिवसेनेनेच आज नगरपंचायत कार्यालयाला टाळे ठोकण्याचा प्रकार केला. मात्र पोलीस आणि जिल्हा प्रशासनाने केलेल्या तातडीच्या हस्तक्षेपानंतर हे टाळे काढण्यात आले.राज्यात आणि केंद्रात सेना-भाजपा युतीचेच सरकार आहे तर स्थानिक आमदार व खासदारही शिवसेनेचे असल्याने नागरिकांचा रोष सहन करण्याची वेळ येथील स्थानिक नगरसेवकांवर येत आहे. पूर्वी नगरपंचायतीला कायमस्वरूपी मुख्याधिकारी व अभियंते नव्हते यामुळे कारभार ढासळला होता तर आता कायमस्वरूपी मुख्याधिकारी असूनही नगरसेवक आणि प्रशासनातील समन्वयाअभावी जनतेची कामे रखडल्याचे चित्र दिसत आहे. यावर गेले अनेक दिवस तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत होत्या. मात्र याकडे वेळ देण्यास कुणालाच फुरसत नव्हती. सत्तेत असूनही शिवसैनिक याविरोधात होते. मात्र भाजपाकडून याबाबतीत काहीच हालचाली झालेल्या नव्हत्या. यात भरीस भर म्हणून येथील मुख्याधिकारी एक महिन्याच्या वैद्यकीय रजेवर गेल्या आहेत. जनतेचा रोष आपण स्वीकारण्यापेक्षा खरी चूक कोणाची? हे कळण्यासाठी अखेर या सर्व प्रकारावर हल्लाबोल करण्याचा विचार करून नगरसेवक व माजी सभापती बंड्या बोरुकर, प्रभारी नगराध्यक्ष मनिष सावंत, भारतीय विद्यार्थी सेनेचे छोट्या गवाणकर यांनी जिल्हाधिकारी, तहसीलदार, पोलीस ठाणे, आमदार यांना निवेदने सादर करीत याची दखल घ्या अन्यथा नगरपंचायतीला टाळे ठोकू, असा इशारा दिला होता.या इशाऱ्याला २४ तास उलटूनही त्याची दखल न घेतल्याच्या निषेधार्थ गुरुवारी शिवसैनिकांनीच संध्याकाळी ४.३० वाजता नगरपंचायतीला टाळे ठोकले. यावेळी नगरसेवक बंड्या बोरुकर, प्रभारी नगराध्यक्ष मनिष सावंत, छोट्या गवाणकर, संदीप धावडे, संतोष शिंदे, दीपक कुळ्ये, मुबीन पटेल, अजित घडशी, दत्ता गडदे, नागेश चव्हाण, बबन बोदले आदी शिवसैनिक उपस्थित होते. नगरपंचायतीला टाळे ठोकल्यामुळे सर्व कर्मचारी आतमध्येच अडकले. या कर्मचाऱ्यांनीच तत्काळ देवरूख पोलीस ठाण्यात दूरध्वनी करून घडल्या प्रकाराची माहिती दिली. यानंतर पोलीस ठाण्याचे राजेंद्र जाधव आणि प्रमोद वाघाटे यांनी घटनास्थळी येत शिवसैनिकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. यावर आम्हाला ठोस आश्वासन द्या, अन्यथा टाळे काढणार नाही, असा इशारा देताच संबंधित पोलिसांनी प्रभारी मुख्याधिकारी जावडेकर यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत शिवसैनिक आणि त्यांच्यात संवाद घडवून आणला. यावेळी जावडेकर यांनी आपण शुक्रवारी दुपारी १२ वाजता नगरपंचायतीत हजर होऊ आणि त्यानंतर येथे रखडलेल्या सर्व कामांची माहिती घेऊन ती तातडीने पूर्ण करू, असे आश्वासन त्यांनी दिले. यानंतर सुमारे २० मिनिटानंतर नगरपंचायतीचे टाळे शिवसैनिकांनी काढले. यामुळे उद्या काय होणार याकडे लक्ष लागून राहिले आहे. (प्रतिनिधी)े