शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कृषी कायद्याच्या निषेधार्थ शिराळ्यामध्ये धरणे आंदाेलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:26 IST

शिराळा : दिल्ली येथे सुरू असणाऱ्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आणि केंद्र सरकारने शेतकऱ्यांवर लादलेल्या जुलमी कायद्याला विरोध ...

शिराळा : दिल्ली येथे सुरू असणाऱ्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आणि केंद्र सरकारने शेतकऱ्यांवर लादलेल्या जुलमी कायद्याला विरोध करण्यासाठी शिराळा तहसीलदार कार्यालयासमोर लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आले. सर्वपक्षीय शेतकरी समन्वय समितीने तहसीलदार गणेश शिंदे यांना याबाबतचे निवेदन दिले. यावेळी प्रशिक्षणार्थी भाप्रसे अधिकारी आरोशी सिंग उपस्थित होत्या.

आंदोलनामध्ये राष्ट्रवादी, राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना, शिराळा तालुका कामगार परिषद, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, विद्रोही सांस्कृतिक चळवळ, महाराष्ट्र राज्य, श्रमिक मुक्ती दल (लोकशाहीवादी) आदी संघटना आणि पक्ष सहभागी झाले होते. शेतकऱ्यांवर अन्याय करणारे, शेतकऱ्याला उद‌्ध्वस्त करणारे, तीनही कायदे मागे घेण्यात यावेत. घरगुती गॅस दरवाढ आणि पेट्रोल, डिझेलमधील दरवाढ मागे घ्यावी. नवीन कृषी कायद्यांनी बाजार समिती उद‌्ध्वस्त होणार आहेत. यामुळे शेतकरीदेखील उद्ध्वस्त होऊन भांडवलदार शिरजोर होणार आहे. अन्यायकारक तिन्ही कायदे रद्द केले पाहिजेत. वीज वितरण केंद्र सरकारचे धोरण शेतकऱ्यांवर अन्याय करणारे आहे. यावेळी विजयराव नलवडे, धनाजी गुरव, ॲड रवी पाटील, ॲड. भगतसिंग नाईक, विजयकुमार जोके आदींनी कृषी कायद्याविरोधात आपली भूमिका स्पष्ट केली. प्रा. विजय गायकवाड यांनी महात्मा फुले यांची शेतकरीविषयक भूमिका विशद केली. यावेळी महात्मा फुले आणि गाडगेबाबा यांच्या वेशामध्ये आलेले कार्यकर्ते हे या आंदोलनाचे आकर्षण ठरले.

या लाक्षणिक धरणे आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष विजयराव नलवडे काँग्रेसचे तालुका अध्यक्ष ॲड. रवी पाटील, चंद्रकांत निकम, शिवसेना तालुकाप्रमुख संतोष हिरूगडे, अंनिसचे जिल्हाध्यक्ष प्रा. विजयकुमार जोखे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजाराम पाटील, उपनगराध्यक्ष विजय दळवी, नगरसेवक मोहन जिरंगे, मारुती रोकडे, महादेव माने, मोहन जिरंगे, सागर घोलप, कीर्तीकुमार पाटील, विश्वास कदम, अमर पाटील, प्रा. विजय गायकवाड, सुनील कवठेकर, अमोल शिंदे आदी उपस्थित होते.