शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

राजकीय पक्ष टिकले, तरच लोकशाही टिकेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 01:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क वाटेगाव : देशात राजकीय पक्ष टिकले, तरच लोकशाही टिकेल. त्यामुळे सत्तेच्या केंद्रात विविधता राहील अन्यथा राजेशाही निर्माण होईल, म्हणूनच लोकशाहीर अण्णा भाऊ साठे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांशी प्रामाणिक रहा, असे प्रतिपादन माजी खासदार प्रकाश आंबेडकर यांनी केले. वाटेगाव (ता. वाळवा) येथे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या ...

ठळक मुद्देपूर्वजांनी तयार केलेली आर्थिक व्यवस्था कोणालाही तोडता येणार नाही.
लोकमत न्यूज नेटवर्कवाटेगाव : देशात राजकीय पक्ष टिकले, तरच लोकशाही टिकेल. त्यामुळे सत्तेच्या केंद्रात विविधता राहील अन्यथा राजेशाही निर्माण होईल, म्हणूनच लोकशाहीर अण्णा भाऊ साठे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांशी प्रामाणिक रहा, असे प्रतिपादन माजी खासदार प्रकाश आंबेडकर यांनी केले.वाटेगाव (ता. वाळवा) येथे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या ९७ व्या जयंतीनिमित्त आयोजित अभिवादन सभेत आंबेडकर बोलत होते. ते म्हणाले की, आज देशात द्वेषाचे राजकारण चालले आहे. ते कोणाच्याही भल्याचे नाही. आजचे युग हे आर्थिक युग आहे. तेव्हा त्याचा अभ्यास करावा लागेल. पूर्वजांनी तयार केलेली आर्थिक व्यवस्था कोणालाही तोडता येणार नाही.डॉ. भारत पाटणकर यांनीही मनोगत व्यक्त केले. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे स्मारकासमोरील पुतळ्यास माजी खासदार प्रकाश आंबेडकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराज पाटील, माजी बांधकाम सभापती रवींद्र बर्डे, सरपंच प्रकाश पाटील, उपसरपंच प्रमोद साठे, राहुल पाटील, राहुल चव्हाण, संपतराव मुळीक, किरण नांगरे, संपतराव देसाई, हेमंत मुळीक, जयेश मोहिते, सचिन बर्डे, जनार्दन साठे, महावीर बापुळे, संदीप साठे, अण्णा भाऊंच्या स्नुषा सावित्री साठे, नातू सचिन साठे, फकिरा साठे, विजय लोंढे, संजय खवळे, प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव, तहसीलदार सविता लष्करे, गटविकास अधिकारी राहुल गावडे, ज्येष्ठ समाजसेवक बाबासाहेब पाटील, ग. चि. ठोंबरे, तलाठी राजेंद्र पाटील, ग्रामविकास अधिकारी एस. डी. सातवेकर, सचिन बागडे यांनी अभिवादन केले.वाटेगाव ग्रामपंचायत, क्रांतिवीर बर्डे गुरुजी संस्था समूह, वाटेगाव सोसायटी, शाळा, विविध संस्थांमध्ये राजारामबापू, लोकमान्य, टिळक, अण्णा भाऊंच्या प्रतिमांचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.येलूर (ता. वाळवा) येथे लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी, लोकनेते राजारामबापू पाटील यांची जयंती साजरी करण्यात आली. तंटामुक्त समितीचे अध्यक्ष राजन महाडिक यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्व संस्थांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष यांच्याहस्ते प्रतिमांचे पूजन करण्यात आले. यावेळी जे. टी. महाडिक, धनाजीराव पाटील, भगवानराव जाधव, भास्करराव जाधव, विनायकराव महाडिक, भास्करराव पाटील, सरदार गायकवाड, महिपती गायकवाड, दिनकरराव जाधव उपस्थित होते.पेठ (ता. वाळवा) येथे अण्णा भाऊ साठे, लोकमान्य टिळक, लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या प्रतिमांचे पूजन मु. वा. कुलकर्णी, अतुल पाटील, माजी उपसरपंच संदीप पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी ज्ञानेश्वर पेठकर, माजी पं. स. सदस्य संपतराव बोडरे, तंटामुक्ती अध्यक्ष संपतराव पाटील, उपसरपंच डॉ. अरुण पवार, हेमंत पाटील, अशोक पाटील, बी. डी. पाटील, आर. डी. पाटील, तुळशीदास पिसे उपस्थित होते. स्कूलमध्ये अतुल पाटील, सर्जेराव जाधव, ए. व्ही. पाटील यांच्या उपस्थितीत कार्यक्रम झाला. मु. वा. कुलकर्णी अध्यक्षस्थानी होते. यावेळी संदीप पाटील, लहू गुरव, अपूर्वा आवळे, डी. एस. पाटील, अशोक माळी, उपस्थित होते. एस. एम. शेख यांनी आभार मानले. आत्मशक्ती शिक्षण संस्थेत हणमंतराव पाटील यांच्याहस्ते प्रतिमा पूजन झाले.कामेरीत विविध उपक्रमांनी अभिवादन कामेरी (ता. वाळवा) येथे जनसेवा मंडळाच्यावतीने लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली. यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. जि. प. सदस्य सुरेखा जाधव, युवा नेते जयराज पाटील यांच्याहस्ते अण्णा भाऊ साठे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी डीपीआयचे राज्य उपाध्यक्ष नंदकुमार नांगरे, संजय सकटे उपस्थित होते.