शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

मांगले गटात मातब्बर इच्छुकांची कोंडी

By admin | Updated: January 13, 2017 23:15 IST

आरक्षणामुळे महिलाराज : उमेदवारांचा शोध सुरू; नाईक घराण्यातच संघर्ष होण्याचे संकेत

पी. एन. मोहरेकर ल्ल मांगलेपुनर्रचनेत शिराळा तालुक्यातील मांगले जिल्हा परिषद मतदारसंघ ओबीसी महिलेसाठी आरक्षित झाल्याने मातब्बरांची निराशा झाली आहे. राष्ट्रवादीचे वर्चस्व असलेल्या या गटातील मांगले गण मागासवर्गीय महिलेसाठी, तर सागाव गण खुल्या वर्गातील महिलांसाठी आरक्षित झाल्याने या गटात महिलाराज अवतरणार आहे. येथे राष्ट्रवादी व कॉँग्रेस आघाडी विरुध्द भाजप असा सामना असून, नाईक घराण्यातच संघर्षाचे संकेत मिळत आहेत.मांगले जिल्हा परिषद गटाचे पंधरा वर्षांनंतर पुन्हा अस्तित्व निर्माण झाले असून, १५ गावांचा समावेश करण्यात आला आहे. सागाव गट रद्द करुन सागाव व मांगले गण निर्माण करण्यात आले आहेत. मांगलेत प्रथमच विद्यमान आमदार शिवाजीराव नाईक व माजी आमदार मानसिंगराव नाईक यांच्या चिखली गावाचा समावेश करण्यात आल्याने अत्यंत प्रतिष्ठेची निवडणूक होणार आहे. तिन्ही ठिकाणच्या महिला आरक्षणामुळे इच्छुक मातब्बरांची कोंडी झाली आहे. मात्र नाईक घराण्यातच लढत होणार असल्याचे संकेत आहेत.शिराळा तालुक्यातील सर्वाधिक संवेदनशील जिल्हा परिषद गट अशी ओळख असलेल्या मांगलेतून मोरणा समूहाचे संस्थापक विलासराव पाटील, भैरवनाथ समूहाचे संस्थापक शंकरराव चरापले, अमरसिंह नाईक, डॉ. उषाताई दशवंत यांनी यापूर्वी प्रतिनिधीत्व केले आहे. शिराळा नगरपालिका झाल्याने शिराळा गट रद्द होऊन मांगले गटाचे पुन्हा अस्तित्व निर्माण झाले आहे. सागाव गट व कांदे गण रद्द करुन मांगले गटात समावेश करण्यात आला आहे. मांगले गटात प्रथमपासूनच आजी-माजी आमदारांत काटा लढती झाल्या. यामध्ये १९९६-९७ च्या निवडणुकीत तत्कालीन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शंकरराव चरापले यांच्याविरोधात स्वत:चे मतदान नसताना अमरसिंह नाईक यांना फत्तेसिंगराव नाईक यांनी उतरवून विजयश्री खेचून आणली होती. तेव्हापासून आजपर्यंत या गटावर विश्वास कारखाना गटाचे म्हणजेच राष्ट्रवादीचे माजी आमदार मानसिंगराव नाईक यांचे वर्चस्व आहे. मात्र मांगले गणात २००७ च्या निवडणुकीत ज्येष्ठ नेते विलासराव पाटील यांना पराभूत करुन माजी उपसभापती प्रल्हाद पाटील यांच्यारुपाने प्रथमच आमदार शिवाजीराव नाईक यांनी शिरकाव केला होता. त्यानंतर झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत सर्वाधिक लोकसंख्या असणाऱ्या मांगलेवरही वर्चस्व प्रस्थापित केले आहे.शिवाजीराव नाईक यांना रोखण्यास युतीजिल्ह्यात दोन्ही काँग्रेस स्वबळावर लढणार आहेत. मात्र गत निवडणुकीत व सध्याही जिल्ह्यात काहीही होवो, तालुक्यात मात्र आमदार शिवाजीराव नाईक यांना रोखण्यासाठी काँग्रेसचे सत्यजित देशमुख व राष्ट्रवादीचे मानसिंगराव नाईक यांची युती आहे. या जोरावर त्यांनी पंचायत समितीवर आघाडीचा झेंडा फडकविला होता. पुनर्रचनेत मांगले गटात १५ गावांचा समावेश करण्यात आला आहे. मांगले गणात- मांगले, देववाडी, लादेवाडी, चिखलवाडी, फकीरवाडी, इंग्रुळ, कापरी, जांभळेवाडी या ८ गावांचा समावेश करण्यात आला आहे. सागाव गणात - सागाव, कांदे, चिखली, नाटोली, भाटशिरगाव, भागाईवाडी, ढोलेवाडी या ७ गावांचा समावेश करण्यात आला आहे.