शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

मागणी तेथे तातडीने चारा छावण्या देणार

By admin | Updated: May 5, 2016 00:26 IST

दिलीप कांबळे : तासगावात आढावा बैठक

तासगाव : तासगाव तालुक्यात मागणी होईल तिथे तातडीने चारा छावण्या सुरु करण्यात येतील, असे मदत व पुनर्वसन राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी बुधवारी स्पष्ट केले. शेतकरी एकटा नाही, शासन तुमच्यासोबत आहे, हा मुख्यमंत्र्यांचा संदेश देण्यासाठी मी इथे आलो असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.कांबळे यांनी तालुक्यात गेल्या चार वर्षापासून टंचाईचा सामना करणाऱ्या धामणी, पाडळी आणि नरसेवाडी या गावांची पाहणी केली. या गावांतील परस्थिती जाणून घेतल्यानंतर तासगाव पंचायत समितीत आढावा बैठक घेतली. यावेळी आमदार सुमनताई पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भोसले, प्रांताधिकारी सुभाष बोरकर, तहसीलदार सुधाकर भोसले, सभापती स्वाती लांडगे, उपसभापती अशोक घाईल, गटविकास अधिकारी सतीश गाढवे यांच्यासह अधिकारी, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य उपस्थित होते. तालुक्यातील टंचाईबाबत पदाधिकाऱ्यांच्या भावना मंत्री कांबळे यांनी जाणून घेतल्या. त्यानंतर टंचाईबाबत सरकार संवेदनशील असून, तातडीने उपययोजनांची अंमलबजावणी करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.ते म्हणाले की, १५ मे नंतर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आणखी गंभीर होणार आहे. त्यामुळे शक्य असेल तिथे सिंंचन योजना सुरु ठेवण्याबाबत निर्णय घेतला जाईल. चारा छावण्यांचा मागचा अनुभव चांगला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी विहित नमुन्यात मागणी केल्यानंतर तातडीने चारा छावणी सुरु करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. तरीदेखील एखादी चांगली संस्था चारा छावणीसाठी पुढाकार घेत असेल तर, अशा संस्थेला छावणी सुरु करण्यास परवानगी दिली जाईल. मिरजेतून लातूरला पाणी देता, कर्नाटकला पाणी दिले जाते, मात्र पाणी योजना असूनदेखील पाच किलोमीटरवर असणाऱ्या धामणी, पाडळीसारख्या गावांना पाणी मिळत नाही, हे योग्य नाही. असे सांगून या गावांना दोन दिवसांत बुर्ली योजनेतून पाणी देण्याचे आदेश मंत्री कांबळे यांनी योवळी दिले. (वार्ताहर)...‘प्रादेशिक’ वीज बिल : निर्णय आठ दिवसांतप्रादेशिक पाणी योजनांना व्यावसायिक पध्दतीने वीज बिल आकारणी केली जाते. त्यामुळे योजनेचे १६ कोटींचे वीज बिल थकित आहे. हे वीज बिल शासनाने भरुन, यापुढे सिंंचन योजनांप्रमाणे कमी दराने वीज बिल आकारणी करावी, अशी मागणी लोकप्रतिनिधींनी यावेळी केली होती. याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत आठ दिवसांत निर्णय घेऊन वीज बिल कमी करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिलीप कांबळे यांनी दिले.