तालुक्यातील गरीब, कष्टकरी, शेतकरी मजूर कामगारांच्या मुलांना उच्च शिक्षणासाठी उपकेंद्र उपयोगी व सोयीचे होणार आहे. भाैगोलिकदृष्ट्या सोयीचे असल्याने जिल्ह्यातील पूर्व व उत्तर भागातील विद्यार्थ्यांना सोयीचे होणार आहे. औद्योगिक वसाहतीत काम करून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थांचीही सोय होणार आहे. कुपवाड शहरालगत जिल्हा न्यायालय, पोलीस मुख्यालय पदव्युत्तर शिक्षणाची सोय असलेली सर्व महाविद्यालये, शासकीय व खासगी तंत्रनिकेतन व अनेक शैक्षणिक संकुल आहेत. विद्यार्थिनींसाठी शासकीय वसतिगृह व दळणवळणाची साधने येथे उपलब्ध आहेत. म्हणून कुपवाड शहरात शिवाजी विद्यापीठाचे नियोजित उपकेंद्र उभारण्यात यावे. अन्यथा वंचित बहुजन आघाडीतर्फे आंदोलन करण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीतर्फे निवेदनाद्वारे देण्यात आला.
यावेळी जिल्हाध्यक्ष महावीर कांबळे, उमरफारूक ककमरी, वसंत भोसले, अनिल अंकलखोपे, संजय गुदगे, प्रशांत वाघमारे, बाबासाहेब कांबळे, संजय कांबळे, कृष्णा भारतीय, ऋषिकेश माने आदी उपस्थित होते.