शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

शाळांमध्ये साहित्य विक्री थांबविण्याची मागणी

By admin | Updated: August 26, 2014 22:20 IST

महाराष्ट्र राज्य ग्रामीण शालेय साहित्य विक्रेता संघ

इस्लामपूर : सांगली जिल्ह्यातील विविध प्राथमिक व माध्यमिक शाळांमधून शासनाची परवानगी न घेता बेकायदेशीरपणे सुरू असणारी शालेय साहित्याची विक्री थांबवावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य ग्रामीण शालेय साहित्य विक्रेता संघाने जि. प.च्या माध्यमिक शिक्षण अधिकाऱ्यांकडे केली आहे.याबाबतचे निवेदन संघाचे पदाधिकारी नाना कांबळे (मिरज), मोहन पाटील, जगोध्दार पाटील (इस्लामपूर), विनायक मोहिते (मिरज) यांनी माध्यमिक शिक्षण विभागाचे कक्ष अधिकारी अजिंक्य कुंभार यांना दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की, शालेय विक्रेता संघामार्फत शाळांमधून होत असलेल्या शालेय साहित्याची विक्री थांबविण्याबाबत वेळोवेळी मागणी केली होती. मात्र ही साहित्य विक्री खुलेआमपणे व मनमानी पध्दतीने सुरुच आहे. यामध्ये विद्यार्थी व पालकांची लूट होत असल्याच्या तक्रारीही झाल्या आहेत. मात्र अशा शाळांविरुध्द कोणतीही कारवाई झालेली नाही. काही शाळांमध्ये शिक्षकांच्या संबंधितांनाच अशा प्रकारची साहित्य विक्री करण्याची परवानगी दिली जाते, असेही आढळून आले आहे. शाळांमधून अशी मनमानी पध्दतीने साहित्य विक्री करण्यासाठी शासनाची परवानगी नाही. या गंभीर बाबीची दखल घेऊन शिक्षण अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील अनुदानित व विनाअनुदानितसह वेगवेगळ्या माध्यमांच्या शाळांना साहित्य विक्री बंद करण्याबाबतचे सक्त आदेश द्यावेत, अशी मागणी केली आहे. शालेय साहित्य विक्रीला बंदी न घातल्यास भविष्यात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा विक्रेता संघाने दिला आहे. यावेळी कांतिलाल कोठारी, जितूभाई शहा, सचिन शहा (माधवनगर), सदाशिव माळी, शंकरराव जाधव, संतोष पाटील उपस्थित होते. (वार्ताहर)सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना परिपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे. शाळांमधून कोणत्याही शालेय साहित्याची विक्री करण्यासाठी शासनाकडून कसलीही परवानगी दिली जात नाही. शालेय विक्रेता संघ अथवा पालकांकडून प्राप्त झालेल्या तक्रारींची चौकशी करुन, दोषी आढळणाऱ्या शाळांविरुध्द कारवाई केली जाईल.- अजिंक्य कुंभार, कक्ष अधिकारी, माध्यमिक शिक्षण विभाग.