शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

सांगली महापालिकेची निवडणूक पुढे ढकलण्याचा डाव: जयंत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2018 23:29 IST

कुपवाड : महापालिकेची यंदाची निवडणूक का जाहीर होत नाही, हे समजेनासे झाले आहे. तेरा आॅगस्टला महापालिकेचा नवा महापौर निवडावा लागणार आहे. तरीही ही निवडणूक जाहीर होत नाही. जनमानसात फार पाठिंबा मिळत नसल्यामुळे या निवडणुका पुढे ढकलण्याचा भाजपचा डाव आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष, आमदार जयंत पाटील यांनी केली.आ. पाटील यांची ...

कुपवाड : महापालिकेची यंदाची निवडणूक का जाहीर होत नाही, हे समजेनासे झाले आहे. तेरा आॅगस्टला महापालिकेचा नवा महापौर निवडावा लागणार आहे. तरीही ही निवडणूक जाहीर होत नाही. जनमानसात फार पाठिंबा मिळत नसल्यामुळे या निवडणुका पुढे ढकलण्याचा भाजपचा डाव आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष, आमदार जयंत पाटील यांनी केली.आ. पाटील यांची पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा कुपवाड शहर राष्ट्रवादी कॉँग्रेस पार्टीच्यावतीने नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी माजी महापौर सुरेश पाटील, जिल्हाध्यक्ष संजय बजाज, कमलाकर पाटील, श्रीनिवास पाटील, धनपाल खोत, विष्णू माने, शेडजी मोहिते, जमीर रंगरेज प्रमुख उपस्थित होते.आ. पाटील पुढे म्हणाले, महापालिका क्षेत्राची जबाबदारी यापूर्वी एकदा जनतेने आम्हाला दिलेली होती. त्यावेळी कुपवाडचा पाणी प्रश्न सोडविलेला आहे. शाळांचे प्रश्नही मार्गी लावले होते. यापुढील काळात शहरात भव्य उद्यानासह इतर प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील. देशात भूलथापा मारून सत्तेवर आलेल्या भाजप सरकारबद्दल जनमानसात प्रचंड नाराजी आहे. भाजपचे मंत्री विकासाऐवजी वेगळ्याच कामात रस दाखवित असल्याचा आरोपही त्यांनी केला.यावेळी संजय बजाज, सुरेश पाटील, विष्णू माने, धनपाल खोत, शेडजी मोहिते यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रकाश व्हनकडे यांनी आभार मानले.कार्यक्रमास जमीर रंगरेज, मोहनसिंग रजपूत, बल्लू शाखला, दत्ता पोटोळे, भूपाल सरगर, सागर खोत, आशुतोष धोतरे, विजय खोत, संजय औधकर, मेजर जंबूलाल खताळ उपस्थित होते.