शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

कुलगुरू देवानंद शिंदेंना हटविण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2019 00:13 IST

सांगली : शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र सांगली परिसरात करण्याबाबत जिल्हा प्रशासनाने सकारात्मक अहवाल दिलेला असतानाही, कुलगुरू देवानंद शिंदे यांनी खानापूरची ...

सांगली : शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र सांगली परिसरात करण्याबाबत जिल्हा प्रशासनाने सकारात्मक अहवाल दिलेला असतानाही, कुलगुरू देवानंद शिंदे यांनी खानापूरची जागा रेटण्याचा प्रयत्न चालविला आहे. त्यामुळे कुलगुरू हटाव, विद्यापीठ बचाव आंदोलन हाती घेणार असल्याचे विद्यार्थी संघटनांच्यावतीने सुधार समितीचे निमंत्रक अ‍ॅड. अमित शिंदे यांनी शुक्रवारी पत्रकार बैठकीत सांगितले. याबाबत राज्यपालांकडे पुराव्यानिशी तक्रारी केल्या असून याची दखल न घेतल्यास न्यायालयात जाण्याचा इशाराही शिंदे यांनी दिला आहे.अ‍ॅड. शिंदे म्हणाले की, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू शिंदे यांच्याबाबत ‘सुटा’ या संघटनेने पुराव्यानिशी अनेक तक्रारी राज्यपालांकडे केल्या आहेत. विद्यापीठाचे उपक्रेंद्र सांगलीत व्हावे यासाठी सुधार समिती आणि अन्य संघटना गेल्या काही महिन्यांपासून आंदोलन करीत आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनीही तसा विद्यापीठाला प्रस्ताव पाठविलेला असताना, कुलगुरूंनी खानापूरचा प्रस्ताव रेटला आहे. विद्यापीठातील निर्माण झालेल्या सर्व शैक्षणिक प्रश्नांना कुलगुरूच जबाबदार आहेत. विद्यापीठाची पदवी एकाच सहीने असल्याचे आदेश असताना, कुलगुरुंनी दोन स'ांचे पदवी प्रमाणपत्र काढून खर्च वाढविला. कुलगुरुंनी शिक्षण सल्लागार म्हणून एका व्यक्तीची नियुक्ती केली आहे. शिवाजी विद्यापीठात संशोधनाऐवजी कार्यालये नूतनीकरणावर लाखो रुपये खर्च केले जात आहेत. एकेका खोलीत पाच-पाच विद्यार्थी कोंबले आहेत. कुलगुरुंनी स्वत:ची खासगी बिले काही ठेकेदाराकडून भरून घेतल्याच्याही तक्रारी आहेत. लाखो रुपयांचा गॉगल कुलगुरुंकडे आला कोठून? विद्यापीठातील सर्व गैरकारभाराला कुलगुरुच जबाबदार आहेत. त्यांची तात्काळ बदली करा, अन्यथा आंदोलन केले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. यावेळी सचिन सव्वाखंडे, तेजस नांद्रेकर, शिवाजी त्रिमुखे, शुभम जाधव, गौरव घाडगे, शुभम ठोंबरे, जयंत जाधव आदी उपस्थित होते.विद्यापीठ उपकेंद्रप्रश्नी भूमिका स्पष्ट करावीलोकसभा निवडणुकीमध्ये विद्यार्थी, युवकांचे मतदान मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी विद्यापीठ उपकेंद्राबाबत भूमिका करावी. उपकेंद्राला पाठिंबा देणाऱ्या उमेदवारांचा संघटनेकडून विचार केला जाईल, असेही पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.