शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

उपयोगकर्ता कर कमी करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 04:21 IST

संतोष पाटील म्हणाले, उपयोगकर्ता कराविरोधात व्यापारी, फेरीवाल्यांसह नागरिकांचे मोर्चे निघत आहेत. नगरसेवकांना प्रभागात उत्तरे देताना नाकीनऊ झाले ...

संतोष पाटील म्हणाले, उपयोगकर्ता कराविरोधात व्यापारी, फेरीवाल्यांसह नागरिकांचे मोर्चे निघत आहेत. नगरसेवकांना प्रभागात उत्तरे देताना नाकीनऊ झाले आहे. प्रशासनाने तो कर कमी करण्यात येणार नसल्याचे स्पष्ट केले. त्याचे अधिकार शासनाला आहेत. महापालिका निर्णय घेऊ शकत नसली, तरी वस्तुस्थिती तपासली पाहिजे. सरसकट घरांना मासिक ५० रुपये, तर व्यापार्‍यांना त्या तुलनेत उपयोगकर्ता कर लावला आहे. त्यामुळे घरपट्टी कमी आणि उपयोगकर्ता कर जादा, अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे हजार चौरस फुटापर्यंत मासिक २० रुपये, त्यापेक्षा मोठ्या घरांना ३० ते ४० रुपये असे टप्प्या-टप्प्याने कर लावण्यात यावेत. त्यासंदर्भात किमान महासभेने ठराव करून शासनाला कळवावे, अशी मागणी केली.

भाजप नेते शेखर इनामदार म्हणाले, उपयोगकर्ता कराबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. तो दूर करणे आणि त्याबाबत जरी निकष लावले असले, तरी त्यात सुधारणा होणे गरजेचे आहे. तो रद्द होणार नसला, तरी त्यासंदर्भात सुधारणा करून शासनाला कळवू, अशी भूमिका घेतली. त्याला महापौर गीता सुतार यांनीही सहमती दर्शविली.

चौकट

व्यापारी संघटनेचे मुख्यमंत्र्यांना साकडे

व्यापारी एकता असोसिशनने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून उपयोगकर्ता कर रद्द करण्याची मागणी केली आहे. संघटनेचे अध्यक्ष समीर शहा म्हणाले की, उपयोगकर्ता कराविरोधात जनतेत असंतोष आहे. या कराच्या अंमलबजावणीला स्थगिती देऊन करदात्यांना हरकती दाखल करण्याची संधी द्यावी, अशी मागणी केली आहे.