शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

कारागिरांना मदत देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:20 IST

संचारबंदीमुळे नृत्य कलाकारांचे हाल सांगली : कोरोना वैश्विक महामारीने सगळ्यांचे जगणे अवघड होऊन बसले आहे. पाहिला लॉकडाऊन संपल्यानंतर जगण्याची ...

संचारबंदीमुळे नृत्य कलाकारांचे हाल

सांगली : कोरोना वैश्विक महामारीने सगळ्यांचे जगणे अवघड होऊन बसले आहे. पाहिला लॉकडाऊन संपल्यानंतर जगण्याची आशा पल्लवित झाल्या असतानाच कोरोनाची दुसरी लाट आली. त्यामुळे पुन्हा संचारबंदी करण्यात आली. त्यामुळे अनेकांची परिस्थिती बिकट बनली आहे. अशा परिस्थितीत नृत्य कलाकारांचे हाल होत असून त्यांना कुणाकडूनही मदत होत नाही.

अवैध गुटखा विक्री सुरूच

सांगली : काेराेना संक्रमण वाढत असल्याने शासनाने कडक निर्बंध लादले आहेत. जीवनावश्यक वस्तूंशिवाय इतर दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र, तरीही सांगलीत काही पानपट्टी चालकांकडून छुप्या पद्धतीने गुटखा विक्री सुरूच असल्याचे चित्र आहे. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष हाेत आहे़

बैलांद्वारे नांगरणी झाली दुर्मीळ

सांगली : कृृृषी व्यवसायात उन्हाळी नांगरटीला अनन्यसाधारण महत्त्व दिले जाते. अलीकडील काळात यांत्रिकीकरणाच्या मदतीने शेतीच्या मशागतीला प्राधान्य दिले जाते. त्यामुळे यापूर्वी बैलांच्या मदतीने होणाऱ्या मशागती अगदी नगण्य होत चालल्या आहेत.

घरचे साेयाबीन बियाणे वापरा

सांगली : सोयाबीन हे स्वपरागसिंचित पीक आहे. या पिकाचे सर्वच वाण सरळ वाण आहेत. त्यामुळे दरवर्षी बियाणे बदलाची आवश्यकता नाही. एकदा प्रमाणित बियाणे वापरल्यानंतर त्याच्या उत्पादनातून येणारे बियाणे पुढील २ वर्षांपर्यंत वापरात येते. शेतकऱ्यांनी स्वत:कडील बियाणे वापरल्यास उत्पादन खर्च कमी होईल, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

हमालांवर उपासमारीची वेळ

सांगली : संपूर्ण दिवसभर पाठीवर ओझे वाहून चार पैसे कमावणाऱ्या हमालांवर उपासमारीची वेळ आली आहे. कोरोनाच्या निर्बंधांमुळे काम मिळत नसल्याने हातावर पोट असलेला हा कष्टकरी वर्ग अर्धपोटी राहून दिवस काढत आहे. राज्यभरातील सव्वालाख हमालांची आज आर्थिक कोंडी झाली आहे. कुटुंबाचा गाडा हाकायचा कसा, याची चिंता त्यांना सतावत आहे.

करवसुलीवर परिणाम

सांगली : महापालिका, नगरपालिका आणि ग्रामपंचायतींचा बहुतांश कारभार दरवर्षी गोळा होणाऱ्या करामधूनच चालतो. मात्र, कोरोना संकटामुळे करवसुली थांबली. याचा शहर विकासावर परिणाम हाेईल.

बांधबंदिस्तीच्या कामांना वेग

करगणी : कृषी विभागाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या पाणलोट विकास योजनेंतर्गत शेतशिवारांमध्ये बांधबंदिस्तीची कामे सध्या वेगात सुरू असल्याचे दिसून येत आहे.