शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसचा उमेदवार जाहीर करण्याची मागणी

By admin | Updated: July 17, 2014 23:39 IST

मिरजेतील बैठकीत निर्णय : अन्यथा कार्यकर्तेच उमेदवार निवडणार

मिरज : मिरज विधानसभा मतदार संघातील अकरा जिल्हा परिषद गटातून २२ काँग्रेस कार्यकर्त्यांची समिती विधानसभा निवडणुकीसाठी नियुक्त करण्याचा निर्णय तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या बैठकीत घेण्यात आला. तसेच काँग्रे्रसने आठ दिवसात उमेदवार जाहीर करावा, अन्यथा कार्यकर्तेच उमेदवार जाहीर करुन कामाला लागतील, असा इशाराही पक्षनेत्यांना देण्यात आला. विधानसभा निवडणुका जवळ आल्या तरी उमेदवार निश्चित नसल्याने मिरज मतदार संघात काँग्रेसइच्छुकांत जोरदार चुरस व परस्परांवर कुरघोड्या सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर तालुकाध्यक्ष अमरसिंह पाटील, माजी सभापती अनिल आमटवणे, अण्णासाहेब कोरे, सोनीचे सरपंच दिनकर पाटील, राजू कोरे, म्हैसाळचे अनिल कबुरे, सलगरेचे तानाजी पाटील, खंडेराव जगताप, वसंतराव गायकवाड, आर. आर. पाटील, जिल्हा परिषद सदस्य प्रकाश देसाई, पंचायत समिती सदस्य दिलीप बुरसे, बी. के. कांबळे, राजेंद्र बरगाले, निवासबापू पाटील, रावसाहेब बेडगे यांच्यासह कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत बैठक झाली. पक्षाचा उमेदवार जाहीर करण्यापासून प्रत्यक्ष निवडणुकीत भाजपच्या पाडावासाठी समिती पूर्ण ताकदीने प्रयत्न करेल, असेही बैठकीत निश्चित करण्यात आले.मतदार संघातील प्रत्येक गावातून एक, असे ४७ प्रतिनिधी निवडण्यात आले. या प्रतिनिधींतून ११ जिल्हा परिषद गटातून प्रत्येकी दोन, अशा २२ कार्यकर्त्यांची समिती निवडण्यात येणार आहे. निवडण्यात आलेले बावीस प्रतिनिधी शहरातील नेत्यांशी चर्चा करुन मतदार संघात काँग्रेसचा उमेदवार निश्चित करुन त्याच्या प्रचाराला सुरुवात करणार आहेत. (वार्ताहर)