शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

चिकुर्डे प्रकल्पग्रस्तांच्या जागेबाबत आदेश रद्दची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:29 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ऐतवडे बुद्रुक : चिकुर्डे (ता. वाळवा) येथील धरण, अभयारण्यग्रस्त पुनर्वसन वसाहतमधील माळी समाज दफनभुमी गट नंबर ...

लोकमत न्यूज नेटवर्क

ऐतवडे बुद्रुक : चिकुर्डे (ता. वाळवा) येथील धरण, अभयारण्यग्रस्त पुनर्वसन वसाहतमधील माळी समाज दफनभुमी गट नंबर ९/१ चा आदेश त्वरित रद्द करावा, असे निवेदन खुंदलापूर, टाकळे, झोळंबी, शेंडेवाडी येथील ग्रामस्थांनी शेतकरी परिषदेचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष गौरव नायकवडी तसेच तहसीलदार रवींद्र हसबनीस यांना दिले. दरम्यान, शुक्रवार ९ रोजी जिल्हाधिकारी यांच्यासोबत होणाऱ्या बैठकीमध्ये या विषयावर चर्चा करण्याची ग्वाही गौरव नायकवडी यांनी ग्रामस्थांना दिली.

निवेदनात म्हटले आहे की, आम्ही मूळचे खुंदलापूर, टाकळे, झोळंबी, शेंडगेवाडी येथील रहिवासी होतो. या सर्व प्रकल्पग्रस्तांचे चिकुर्डे येथे पुनर्वसन झालेले आहे. जिल्हा पुनर्वसन अधिकारी यांच्यावतीने या सर्वांना भूखंड दिले आहेत. याच भूखंडापैकी क्रमांक ५६, ५७, ५८, ६०, ५९, ६८, ६९, ७१, ७२ या जागेवर प्रकल्पग्रस्तांची पक्की घरे आहेत. ही जागा जिल्हा पुनर्वसन अधिकारी यांच्या नावे असताना सन २००० मध्ये चिकुर्डे गावातील पुढारी मंडळी व माळी समाजातील प्रतिष्ठित लोकांनी माळी समाजाच्या दफनभुमीसाठी जागा जिल्हा अधिकारी यांच्या आदेशाने सात-बारावर नोंद करून घेतली आहे. हा प्रकल्पग्रस्तांवर मोठा अन्याय आहे.

दोन दिवसांपासून माळी समाजातील लोकांनी या भूखंडामध्ये जेसीबीच्या साह्याने नूतनीकरण सुरू केले आहे. तरी जिल्हाधिकारी यांनी दिलेला माळी समाज दफनभुमी भूखंड नंबर ९/१ चा आदेश त्वरित रद्द व्हावा, अशी मागणी केली आहे.

चौकट....

दोन गटात वाद

माळी समाजाच्यावतीने या ठिकाणी नूतनीकरण सुरू आहे. या नूतनीकरणास विरोध म्हणून येथील प्रकल्पग्रस्तांनी गुरुवारी येथील काम बंद पाडले. यावेळी दोन्ही गटात जोरदार बाचाबाची झाली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून दोन्ही घटनांत शांतता पाळण्याचे आवाहन केले.