शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

बाजार समितीसाठी तिसरी आघाडी निश्चित

By admin | Updated: July 13, 2015 00:33 IST

इच्छुकांच्या मॅरेथॉन मुलाखती : २२ जुलैपूर्वी सर्व पॅनेलची उमेदवार यादी जाहीर होणार

अंजर अथणीकर - सांगली  कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी जनता दल, स्वाभिमानी शेतकरी संघटना व शिवसेना यांची तिसरी आघाडी स्थापन करण्याचे निश्चित झाले झाले. शिवसेनेचे पृथ्वीराज पवार यांनी याबाबत दुजोरा दिला आहे. या निवडणुकीत तब्बल ५०४ उमेदवार उभे असल्यामुळे नेत्यांनी त्यांच्या मुलाखतींना प्रारंभ झाला आहे. आणखी दोन दिवस या मुलाखती चालणार असून दोन्ही पॅनेलकडून २२ जुलैपूर्वीच पॅनेल घोषित करण्यात येणार आहेत. इच्छुकांची गर्दी वाढल्याने तडजोडीसाठी नेत्यांना कसरती कराव्या लागत आहेत. राष्ट्रवादी, भाजप व मदन पाटील यांची बाजार समितीसाठी आता युती झाली आहे. काँग्रेसनेही जनसुराज्य पक्षाबरोबर निवडणूक लढविण्याचे यापूर्वी जाहीर केले आहे. पक्षनिहाय संख्या अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही, मात्र दोन्ही गटांतर्फे इच्छुकांच्या मुलाखती सुरु करण्यात आल्या आहेत. जनता दल, शिवसेना व स्वाभिमानी शेतकरी संघटना या निवडणुकीत उतरणार असून याला अंतिम स्वरूपही देण्यात आले आहे. माजी आ. शरद पाटील, शिवसेनेचे माजी नगरसेवक पृथ्वीराज पवार, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत याला अंतिम स्वरुप देण्यात आले आहे. उमेदवार निवडीचा अंतिम निर्णय खा. राजू शेट्टी, माजी आ. संभाजी पवार, शरद पाटील हे घेणार आहेत. येत्या दोन दिवसात ही यादी जाहीर करण्यात येईल, अशी माहिती पृथ्वीराज पवार यांनी दिली. सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक पाच गटात होत असून, त्यानुसार सहकारी संस्था मतदार संघामध्ये २६६८, ग्रामपंचायत मतदार संघामधून २२८६ व हमाल, तोलाईदार मतदार संघातून १५८० मतदार आहेत. त्याचबरोबर व्यापारी मतदार संघामध्ये १३०६ व प्रक्रिया किंवा खरेदी- विक्री संघातून ३७५ मतदार आहेत. एकूण ८ हजार २२५ मतदार आहेत. नुकत्याच झालेल्या सोसायट्या व ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे चित्र बदलले आहे. यामुळे ज्या क्षेत्रात उमेदवारांचे प्राबल्य आहे, त्यांनाच त्या ठिकाणी उमेदवारी देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी, भाजपकडून सध्या मुलाखती सुरु आहेत. येत्या दोन दिवसात या मुलाखती पूर्ण होणार असून दोन्ही गटातर्फे २२ जुलैपूर्वी पॅनेल जाहीर करण्यात येणार आहे. बंडखोरीचा धोका असला तरी, दोन्ही गटाच्या नेत्यांनी बंडखोरी होणार नसल्याचा दावा केला आहे. गर्दीने पॅनेलला विलंबउमेदवारांच्या मुलाखती सुरू आहेत. इच्छुकांची संख्या अधिक असल्यामुळे याला विलंब लागत आहे; मात्र आम्ही २२ जुलैपूर्वी पॅनेल जाहीर करू, अशी माहिती भाजपचे आ. विलासराव जगताप यांनी दिली. कोणत्या उमेदवाराची कोणत्या गटात ताकत आहे, याची सध्या पडताळणी सुरू आहे. त्यानुसार उमेदवारी दिली जाणार आहे. या निवडणुकीत बंडखोरी होणार नाही व आम्ही खपवूनही घेणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.बंडखोरीचा धोका!सर्वच पॅनेलना बंडखोरीची चिंता लागली आहे. बंडखोरांना शांत करणे तितके सोपे नसल्याने उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशीच पॅनेल जाहीर केले जाणार आहे. जिल्हा बँकेप्रमाणे अद्याप नेत्यांनी उमेदवारांकडून माघारीचे अर्ज भरून घेतले नाहीत. त्यामुळे ऐनवेळी बंडखोरीची डोकेदुखी त्यांना सतावण्याची चिन्हे आहेत. एकमेकांच्या पॅनेलवर लक्षतीन पॅनेलची शक्यता सध्या दिसत असली तरी, या तिन्ही गटांनी एकमेकांच्या उमेदवारांवर लक्ष केंद्रित केले आहे. कोणत्या गटात कोणता उमेदवार दिल्यास त्याचे काय फायदे-तोटे होऊ शकतात, याचे गणितही मांडले जात आहे. त्यानुसारच व्यूहरचना केली जाणार आहे.