शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
2
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
3
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
4
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
5
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
7
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
8
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
9
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
10
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
11
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
12
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
13
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
14
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
15
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
16
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
17
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
18
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
19
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
20
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच

‘बीओटी’चा डाव उधळल्याने बदनामी

By admin | Updated: April 23, 2015 00:37 IST

विवेक कांबळे : स्वकीयांना घरचा आहेर; माजी महापौरांच्या काळातच भानगडी

सांगली : महापालिका क्षेत्रातील सावित्रीबाई फुले प्रसुतीगृह, मजलेकर पेट्रोल पंप, जयश्री टॉकीजच्या जागेवर बीओटी करण्याचा डाव काही सदस्यांनी आखला होता. त्याला आपण विरोध केल्यानेच बदनामी सुरू आहे, असा घरचा आहेर बुधवारी महापौर विवेक कांबळे यांनी स्वकीयांना दिला. महासभेच्या इतिवृत्तात भानगडीचे विषय घेतलेले नसून नागरी हितालाच प्राधान्य दिले आहे. ऐनवेळच्या ठरावाच्या प्रती प्रत्येक नगरसेवकाला देणार आहोत. उलट माजी महापौरांच्या काळातच अनेक भानगडी झाल्याचा आरोपही त्यांनी केला. दोन दिवसापूर्वी महासभेत ऐनवेळचे ठराव घुसडल्यावरून हाणामारी झाली होती. त्या पार्श्वभूमीवर कांबळे यांनी बुधवारी पत्रकारांना इतिवृत्त दाखविले. १७५ ते १७८ क्रमांकाचे ठराव एक (ज) खालील असून १७४ पूर्वीचे ठराव ऐनवेळी घेण्यात आले आहेत. हे विषयही भानगडीचे नाहीत, असे सांगत विवेक कांबळे म्हणाले की, काही सदस्यांनी तीन जागा बीओटी करण्याचा घाट घातला आहे. त्यात सावित्रीबाई फुले प्रसुतीगृह, मजलेकर पेट्रोल पंप, जयश्री टॉकीजच्या मागील जागेचा समावेश आहे. पक्षांची व नेत्यांची बदनामी होऊ नये, यासाठी आपण या विषयावर आतापर्यंत गप्प होतो. या बीओटीला माझा विरोध असल्याने या मंडळींनी बदनामी सुरू केली आहे. या मंडळींनी सत्ताधारी गटातील सदस्य व विरोधकांत गैरसमज पसरवला आहे, असेही ते म्हणाले.महापौर पदाची सूत्रे हाती घेतल्यापासून ऐनवेळच्या ठरावात कोणत्याही भानगडी केलेल्या नाहीत. तरीही विरोधकांकडून साप साप म्हणून भुई धोपटण्याचा प्रकार सुरू आहे. नागरी हिताचेच ठराव महासभेत केले आहेत. कोणत्याहीक्षणी महासभेचे इतिवृत्त जाहीर करण्याची तयारी आहे. त्यांच्या मिरज पॅटर्नला माझा विरोध कायम राहील. मजलेकर पेट्रोल पंपाच्या जागेवर वाद झाला. वस्तुत: ही जागा गेल्या काही वर्षापासून पडून आहे. ती महापालिकेच्या ताब्यात घेऊन त्याचा रेडीरेकनर दराने नव्याने लिलाव काढण्याचा ठराव केला आहे. त्यामुळे महापालिकेच्या उत्पन्नातही वाढ होणार आहे. महासभेतील ऐनवेळच्या ठरावाच्या सत्य प्रती नगरसेवकांना देणार आहोत. महासभेतील गोंधळाबाबत माजी मंत्री मदन पाटील यांच्याशी चर्चा केली आहे. त्यांनी माझ्यावर विश्वास व्यक्त केला असल्याचेही विवेक कांबळे म्हणाले. (प्रतिनिधी)जामदार, मेंढेंकडून गैरकारभारबीओटीच्या भानगडी कोण करते, हे साऱ्यांनाच माहिती आहे. मी एलबीटी वसुलीसाठी प्रयत्नशील आहे. माझ्याकडे एलबीटी, तर त्यांच्याकडे बीओटी आहे, असा टोला कांबळे यांनी लगावला. माजी महापौरांच्या शेवटच्या सभेत ऐनवेळचे ठराव करण्यात आले आहेत. त्यात पटेल चौकातील सिंधी मार्केटला कवडीमोल दराने भाडेपट्टी आकारणी, एका माजी पदाधिकाऱ्याला नुकसानभरपाई, असे अनेक वादग्रस्त ठराव केले आहेत. नेत्यांची बदनामी होऊ नये, यासाठी या विषयावर आपण बोललो नाही. या साऱ्या भानगडीमागे गटनेते किशोर जामदार व सभापती संजय मेंढेच आहेत. त्यांच्या कारभाराला विरोध केल्यानेच आता ते महासभा उधळू पाहात आहेत, असा आरोपही त्यांनी केला. इद्रिस नायकवडी सक्रियमाजी महापौर इद्रिस नायकवडी महापालिकेच्या कारभारापासून सध्या दूर आहेत. काँग्रेसअंतर्गत वादामुळे आता पुन्हा त्यांना पालिकेच्या राजकारणात सक्रिय होण्यासाठी साकडे घातले जात आहे. तसे संकेतही महापौरांकडून देण्यात आले. जयंत पाटील यांच्या विकास महाआघाडीला नायकवडी यांनी दणका दिला होता.