शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

पणूंब्रे वारुणला वीरगळ स्मारकाचे लोकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:27 IST

शिराळा तालुक्यामध्ये सापडणारे वीरगळ प्राचीन गौरवशाली इतिहासाची साक्ष देत आहेत. पण काळाच्या ओघात या वीरगळांचे महत्त्व कमी झाले आणि ...

शिराळा तालुक्यामध्ये सापडणारे वीरगळ प्राचीन गौरवशाली इतिहासाची साक्ष देत आहेत. पण काळाच्या ओघात या वीरगळांचे महत्त्व कमी झाले आणि त्यांची दुरवस्था झाली. असेच दुरवस्थेमध्ये असणारे वीरगळ पणूंब्रे वारुणमधील युवकांनी संवर्धित करण्याचे ठरविले.

श्री शिवप्रतिष्ठान मंडळाच्या तरुणांनी एकत्र येऊन हे कार्य पूर्णत्वास नेले.

सुरुवातीला गावातील लोकांना वीरगळ म्हणजे काय हेच माहीत नव्हते. त्यासाठी सामाजिक माध्यमांचा योग्य तो वापर करून संपूर्ण गावामध्ये जनजागृती केली. लोकांना वीरगळांचे महत्त्व पटल्यानंतर महादेव मंदिर परिसरातील वीरगळ संवर्धनाला सुरुवात केली. लागोपाठ तीन संवर्धन मोहिमा घेऊन वीरगळ परिसर स्वच्छ केला आणि त्यानंतर स्मारक उभारण्याला सुरुवात केली.

स्मारक उभारायचे म्हणजे आर्थिक निधी महत्त्वाचा. अशा वेळी लागणारा सर्व खर्च गावच्या विकासासाठी, समाजसेवेसाठी सदैव तत्पर असणाऱ्या श्री शिवप्रतिष्ठान कला, क्रीडा, सामाजिक आणि सांस्कृतिक मंडळाने उचलला. त्यामुळे स्मारक उभारणीच्या कार्याला गती मिळाली आणि अवघ्या काही दिवसांत स्मारक उभा राहील.

वीरगळ हे आपल्या पूर्वजांनी केलेल्या पराक्रमाची साक्ष देत असतात. त्यांचे जतन आणि संवर्धन होणे गरजेचे आहे. तसेच वीरगळविषयक जनजागृतीची गरज आहे. लोकांनी हा वारसा जपायला हवा, असे वीरगळ अभ्यासक विनोद निंबाळकर यांनी सांगितले.

यावेळी माजी सभापती हणमंतराव पाटील, सरपंच वंदना बनसोडे, उपसरपंच सर्जेराव पाटील उपस्थित होते. अमित पाटील यांनी प्रास्ताविक केले. शिवाजी पाटील यांनी आभार मानले.

चौकट

शिराळ्यामधील पहिले वीरगळ स्मारक पणूंब्रे वारुण येथे उभा राहिलेय ही सर्व गावकऱ्यांसाठी अभिमानाची बाब आहे. भेट देणाऱ्या सर्वांचे स्वागतच राहील,अशीच स्मारके गावोगावी उभारायला हवीत,जेणेकरून येणाऱ्या पिढ्यांना गावचा इतिहास समजेल.

-विनायक शंकर पाटील(वीरगळ अभ्यासक,पणूंब्रे वारुण)