शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मातामृत्यूच्या प्रमाणात ७० टक्क्यांनी झाली घट

By admin | Updated: April 11, 2017 00:19 IST

जिल्ह्यात वर्षात ३० मातांचा बळी : ९९.९९ टक्के मातांची प्रसुती रुग्णालयात

सांगली : सर्वांगीण आरोग्य सेवांचा दर्जा संख्यात्मकच न राहता तो गुणात्मक वाढविण्यासाठी केंद्र शासनाने राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाचा पहिला टप्पा २००५ पासून कार्यान्वित केला. याचा जिल्ह्यात फायदा झाला असून, २००७ मध्ये मातामृत्यूचे प्रमाण ११५ होते. यामध्ये सुमारे ७० टक्के घट होऊन ते ५४ पर्यंत खाली आले आहे. ९९.९९ टक्के मातांची प्रसुती रुग्णालयात होत आहे. तरीही २०१६-१७ वर्षात ३० मातांचा मृत्यू झाला आहे.अभियान सुरू होण्यापूर्वी सांगली जिल्ह्याचा दरहजारी जन्मदर २.२४ असा होता. तो सध्या १.९२ वर आला आहे, तर जन्मापासून एक वर्षाच्या कालावधित होणारे अर्भक मृत्यूचे प्रमाण दर हजार जन्मामागे २५ इतके होते, ते २०१७ पर्यंत ८.३ वर आले आहे. भारतात आजही नवजात अर्भक मृत्यूचे प्रमाण दर हजारी २५ इतके असताना, सांगली जिल्ह्याने यात लक्षणीय घट केली आहे. जिल्ह्यात अतिनवजात व नवजात अर्भक मृत्यूचे प्रमाण हे अनुक्रमे ८.३ इतके आहे.गरोदरपण व प्रसुतीत मातांचा मृत्यू टाळण्यातही जिल्ह्याने प्रगती केली आहे. महाराष्ट्रात २००७ मध्ये एक लाख लोकसंख्येमागे १०४ मातांचा मृत्यू झाला होता, तर सांगली जिल्ह्यात हे प्रमाण ११५ इतके होते. मातेची मासिक पाळी चुकताच नाव नोंदणी करणे सोयीचे असल्याने मदर अँड चाईल्ड ट्रॅकिंग सिस्टीम ही आॅनलाईन गरोदर माता व बालकांची नोंदणी पद्धत सुरू करण्यात आली आहे. या नोंदणीचे फलित म्हणजे जिल्ह्यात प्रसुतीचे प्रमाण वाढले आहे. जिल्ह्यात ९९.९९ टक्के मातांची प्रसुती ही संस्थेत होत आहे. जिल्ह्यात १०० टक्के मातांची नोंदणी करण्यात आली आहे. यासोबतच जन्मलेल्या प्रत्येक बालकाची नोंदणी करून त्याला पुढे दोन वर्षापर्यंत द्यावयाच्या सेवांची नोंद करण्यात येते. या उपायामुळेच मातामृत्यूचे प्रमाण कमी झाले आहे. २०१६-१७ मध्ये महाराष्ट्रात एक लाख लोकसंख्येमागे ८७ मातांचा मृत्यू झाला असून, जिल्ह्यात हे प्रमाण ५४ इतके आहे.गरोदर मातेची प्रसुती सुरक्षित होऊन माता व बालकांना कमीत-कमी ७२ तास आरोग्य यंत्रणेच्या देखरेखीत ठेवता यावे, यासाठी जिल्ह्यात प्रसुती ठिकाणाचे बळकटीकरण करण्यात आले आहे. प्रसुती केंद्राच्या ठिकाणी २४ तास प्रसुतीची व्यवस्था केली असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राम हंकारे यांनी सांगितले.