कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत आजवर १०० रुग्ण आढळून आले असून यापैकी तिघांचा मृत्यू झाला आहे. नोडल अधिकारी शीतल उपाध्ये यांनी बैठकीत गावात कोरोना रुग्णालय उभारण्याची संकल्पना मांडली.
याला उपस्थित पदाधिकाऱ्यांनी मान्यता दिली.
गावात १० बेडचे सुसज्ज कोविड रुग्णालय
उभारण्यात येणार आहे. गावच्या विकास कामांचा निधी व लोकवर्गणीतून
रुग्णालय साकारले जाणार आहे.
कोविड रुग्णालयात रुग्णांना ऑक्सिजनचीही सुविधा उपलब्ध करुन दिली जाणार आहे.
उपाध्ये यांनी गावातील
बाधित रुग्णांची संख्या शून्यावर आणण्यासाठी वाॅर्डनिहाय नियोजन करण्याचे आवाहन केले.
यावेळी केंद्रप्रमुख विजय
नागरगोजे यांनी कोविडची साखळी तोडण्यासाठी विविध उपाययोजना सुचविल्या.
बैठकीसाठी सरपंच राणी नागरगोजे, मारुती जमादार, महेश डुबल, अजित हेगडे, जयदेव कांबळे, नीलाताई शेगावे, लता कांबळे, हेमा नाथ, ग्रामसेविका उज्ज्वला आवळे, पोलीस पाटील दीपक कांबळे, मोहन नागरगोजे उपस्थित होते.